घरमुंबईपवित्र पोर्टलच्या गोंधळामुळे भावी शिक्षक हैराण

पवित्र पोर्टलच्या गोंधळामुळे भावी शिक्षक हैराण

Subscribe

अनेक वर्षांपासून शिक्षक भरती करण्याची मागणी राज्यातून होत होती. पण सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते होते. परंतु ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा निर्णय घेतला. परंतु पोर्टलवर अर्ज करताना येत असलेल्या अनेक समस्यांमुळे भावी शिक्षक हैराण झाले आहेत. मुंबई बाहेरील अनेक इच्छुक अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून धडपड करत आहेत.

राज्य सरकारने शिक्षक भरती करण्याची घोषणा केल्यानंतर सर्व उमेदवारांना आपले अर्ज पवित्र पोर्टलमार्फत भरण्याच्या सूचना केल्या. बी.एड व डी.एड केलेल्या उमेदवारांना भरतीसाठी आपली माहिती पवित्र पोर्टलवर भरणे बंधनकारक केले आहे. पवित्र पोर्टलमध्ये माहिती ऑनलाईन भरण्याची सोय नसून ही माहिती विभागीय उपसंचालकांच्या कार्यालयात ऑफलाईनच भरता येते. त्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून विद्यार्थी चर्नी रोड मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयात अर्ज भरणे, अर्जातील माहिती अद्ययावत करण्यासाठी येत आहेत.

- Advertisement -

अर्ज भरताना किंवा माहिती अद्ययावत केल्यानंतर सिस्टिममध्ये अडचण येत असल्यामुळे ‘ओटीपी’ येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अर्ज भरणे तसेच माहिती अद्ययावत होत नाही. तसेच अर्जाची प्रिंटही काढता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात विभागीय कार्यालयात विचारणा केली असता शिक्षण आयुक्त कार्यालयातून काहीही माहिती मिळत नाही,अशी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येतात, असे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी सांगितले.

सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू केले, पण सरकारच्या अनागोंदी कारभारचा फटका अनेक इच्छुकांना बसत आहे. पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक समस्येमुळे अर्ज करणारे बेजार झाले आहेत. त्यामुळे सरकारने पोर्टलमध्ये माहिती अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मनोज टेकाडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -