घरमुंबईमराठा क्रांती मोर्चा : आज मुंबईत राज्यव्यापी बैठक

मराठा क्रांती मोर्चा : आज मुंबईत राज्यव्यापी बैठक

Subscribe

मराठा क्रांती मोर्चाची येत्या रविवारी आज २० डिसेंबर रोजी मुंबईत राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आरक्षणावर स्थगिती आल्यावर मराठा समाजात असंतोषाचा भडका उडाला. परंतु या असंतोषाची दखल घेण्याची तसदी पण राज्य सरकारने घेतली नाही. या अरकरच्या उदासीन भूमिकेवर विचार करणे आणि पुढील दिशा निश्चिती करण्यासाठी मुंबईत या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चामार्फत केले आहे.

या बैठकीस सकल मराठा समाज मुंबई तर्फे सर्व प्रमुख समन्वयकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करण्यात येत आहे. मराठा समाजाचे आंदोलन सद्यस्थितीत दिशाहीन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारवर पुन्हा दबाव निर्माण केला नाही तर २५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सूनवणीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी व मराठा समाजासाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा समाजाला जास्तीत जास्त कसा मिळू शकेल यावर या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. सकल मराठा समाज, मुंबई आपणा सर्व समन्वयक, विविध संघटना यांना सदरच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वडाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सहकार नगर, वडाळा पूर्व येथे सकाळी १० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -