घरमुंबईआमिष दाखवून बलात्कार करणारा 'शेकाप'चा पदाधिकारी अटकेत!

आमिष दाखवून बलात्कार करणारा ‘शेकाप’चा पदाधिकारी अटकेत!

Subscribe

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमधून अजून १० ते १२ मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूटिंग मिळाले. 

एका महिलेला नोकरीला लावतो असे सांगून तिच्यावर बालात्कार करणाऱ्या ‘शेकाप’च्या पदाधिकाऱ्याला एनआरएआयने पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराग कमलासनन असे या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबई प्रभागातील ‘शेकाप’चा पदाधिकारी आहे. मूळचा केरळचा असलेला श्रीराग हा नवी मुंबईच्या ऊलवे येथे स्थायिक झाला. आपण सोशल वर्कर असल्याचे सगळयांना भासवत, त्याने तिथे आपला जम बसवला. त्याच जोरावर तो शेकापचा पदाधिकारी बनला. ऊलवे येथे त्याने स्वतःचे ऑफिसही सुरु केले. दरम्यान, पीडित महीला ही नेरूळ येथे एका ऑफिसमध्ये कामाला होती. त्या ऑफिसमध्ये आरोपीचं येणं-जाणं असल्यामुळे त्याच्यासोबत तिची ओळख झाली. श्रीरागने  तिला नोकरीचे आमिष दाखवून आपल्या ऊलवे येथील ऑफीसमध्ये बोलावून घेतले आणि तिथेच तिला नोकरी दिली. नोकरी देऊन पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर श्रीरागने हळूहळू तिच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली.

आधी आमिष मग ब्लॅकमेल

दुसरीकडे पीडितेचे कोर्टात डिव्होर्स प्रकरण सुरु होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेउन आरोपीने तिच्या जवळ जाण्याचा अधिक प्रयत्न केला. ‘माझेसुद्धा माझ्या बायकोसोबत पटत नाही. त्यामुळे आपण दोघंही डिव्होर्स घेऊन एकमेकांसोबत लग्न करू’, असे सांगत त्याने तिच्या मनात जागा मिळवली. यातच त्या दोघांचे प्रेमसंबंध आणि शारिरीक संबंध प्रस्थापित झाले. कालांतराने आरोपी आपल्याला फसवत असून, केवळ आपला उपभोग घेत आहे याची पीडितेला जाणीव झाली. त्यामुळे  तिने नोकरी सोडून ती आपल्या घरीच राहू लागली. पीडितेने सर्व सबंध तोडून टाकल्यामुळे संतापलेला श्रीराग तिच्या घरी गेला आणि तिला मारहाण करु लागला. आपल्या शरीर संबंधांचे सर्व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देत तो तिच्याशी जबरदस्ती संबंध ठेवू लागला. इतकंच नाही तर ब्लॅकमेलिंगच्या जोरावर त्याने तिच्याकडून जवळपास 1,50,000 रुपये उकळले. तसंच मुलाचं अपहरण करु अशी तिला धमकीही दिली.

- Advertisement -

यामुळे घाबरुन गेलेल्या पीडितेने अखेर एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून एनआरए पोलिसांनी श्रीराग कमलासननला अटक करत त्याच्यावर ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमधून अजून १० ते १२ मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूटिंग मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -