घरमहाराष्ट्रकोल्हापूरचा शाही दसऱ्याला शासकीय सहभाग, २५ लाखांचा निधीही मिळणार

कोल्हापूरचा शाही दसऱ्याला शासकीय सहभाग, २५ लाखांचा निधीही मिळणार

Subscribe

अंबाबाईचा पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्याशी चर्चा झाली आहे.

कोल्हापूर – यंदा कोल्हापूरच्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रीय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांनी परवानगी दिली असून २५ लाखांचा निधीही सरकारकडून जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

शाही दसरा दोन दिवस चालणार आहे. मात्र, पुढील वर्षीपासून कोल्हापूरचा शाही दसरा तीन दिवस चालणार आहे. दसऱ्यासाठी शाहू पॅलेस ते दसरा चौक ठिकठिकाणी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यातून महिलांना रोजगार निर्माण होणार आहे. तसंच, हा दसरा राज्यस्तरावर व्हावा याकरताही प्रयत्न करण्यात येणार आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. यावेळी, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

- Advertisement -

हा लोकांचा सण असल्याने लोकोत्सव व्हावा यासाठी प्रायोजकही शोधणार आहेत. शासनाचा सहभाग असला तरीही परंपरेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अंबाबाईचा पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्याशी चर्चा झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -