घरमुंबईमेट्रो ३ कारशेडचा अहवाल तयार

मेट्रो ३ कारशेडचा अहवाल तयार

Subscribe

 दोन दिवसांत राज्य सरकारला सादर होणार

कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३ मार्गासाठी कारशेडची जागा शोधण्यासाठी नेमलेल्या समितीने अखेर अहवालाचे काम पूर्ण केले आहे. हा अहवाल येत्या दोन दिवसात राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचे कळते. अहवाल हा लोकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच मेट्रो ३ कारशेडसाठीची अंतिम झालेली जागा लोकांच्या माहितीसाठी स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीच्या काळातील हिवाळी अधिवेशनामुळे या समितीकडून अहवालाचे काम लांबणीवर पडले होते.

मेट्रो ३ कारशेडसाठी काही पर्यायी जागा समितीने सुचवल्या होत्या. त्या जागांवर प्रत्यक्ष पोहचून समितीने पाहणी केली होती. त्यामुळे समिती कोणत्या जागेचा पर्याय राज्य सरकारला सुचवणार ही माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. समितीमार्फत विद्यमान आरे कारशेडच्या जागेवरच शिक्कामोर्तब होईल असे कळते. सध्याच्या आरे कारशेडच्या ठिकाणी कापलेल्या झाडांची संख्या पाहता, तसेच याठिकाणी प्राथमिक कामाला झालेली सुरूवात पाहता याच आरे कॉलनीतील जागेवर मेट्रो ३ चे कारशेड होईल असा पर्याय समितीकडून देण्यात आला असल्याचे कळते. याठिकाणाला पर्यायी जागांमुळे मेट्रोच्या प्रकल्प खर्चा भर पडण्याचा अंदाज पाहता सध्याचा आरे कारशेडचा पर्याय हा प्रवाशांच्या खिशावर कमी भार टाकणारा ठरणार आहे. त्यामुळे पर्यायी सुचवलेल्या जागेवर मेट्रो ट्रेनच्या रिकाम्या फेर्‍या वाढवण्यापेक्षा सध्याचा पर्यायच बरा असे समितीने सुचवल्याचे कळते.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत समितीच्या नेमणुकीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) विभागाच्या अध्यक्षतेत एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन्य संरक्षक अन्वर अहमद यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एमएमआरसीच्या अश्विनी भिडे यांच्याकडून व्यवस्थापकीय संचालक या पदाची जबाबदारी नुकत्याच झालेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये काढून घेण्यात आली आहे. या समितीकडून अहवाल सादर करण्याची वेळ ही २५ डिसेंबर होती. पण अहवाल तयार करण्यासाठी काही कारणामुळे उशीर झाला. त्यामुळेच समितीने अतिरिक्त कालावधी हा अहवाल तयार करण्यासाठी मागितला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -