घरमुंबईघाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर लोखंडी पिलर कोसळला

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर लोखंडी पिलर कोसळला

Subscribe

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर काही वेळापूर्वी एक पिलर रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली. सूत्रांनुसार या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू होते. यावेळी अचानक हा पिलर खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळला. पिलर कोसळल्यामुळे पोलिसांच्या दुचाकीचा आणि एका कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. वाहतुक पोलीसांनी आपली दुचाकी या पुलाखाली पार्क केली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. सध्या रस्त्यामधून हा पिलर हटवण्याचं काम सुरु आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -