घरमनोरंजनसई ताम्हणकर आता, 'कुस्तीच्या' आखाड्यात

सई ताम्हणकर आता, ‘कुस्तीच्या’ आखाड्यात

Subscribe

विशेष म्हणजे स्वत:च्या मालकीची एखादी स्पोर्ट्स टीम असलेली सई ताम्हणकर ही पहिलीच मराठी अभिनेत्री ठरली आहे.

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मालकीची एखादी क्रिकेट टीम असणं, ही गोष्ट काही नवीन नाही. शाहरूख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टीसारख्या बॉलीवूड कलाकारांच्या स्वत:च्या आयपीएल टीम्स आहेत, तर अभिषेक बच्चनकडे कब्बडीची टीम आहे.  मात्र, आता बॉलीवूडपाठोपाठ पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्री स्वत:ची टीम विकत घेणार आहे.  मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमध्ये, ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. यामुळे एका अर्थाने सई कुस्तीच्या आखाड्यात उतरली आहे असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे स्वत:च्या मालकीची एखादी स्पोर्ट्स टीम असलेली सई पहिलीच मराठी अभिनेत्री ठरली आहे. सई ताम्हणकर अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम राबवण्याच्या प्रयत्नात असते. याच धर्तीवर आता सईने हा नवीन आणि आगळावेगळा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामुळे सईचे ताम्हणकरचे चाहते खुष झाले असणार यात काहीच शंका नाही.

- Advertisement -

टीम खरेदी करण्यामागचा सईचा उद्देश…

“मी मुळची सांगलीची असल्यामुळे कोल्हापूरची कुस्ती परंपरा मला ठाऊक आहे. पेहलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात किंवा कोणता डाव कधी टाकावा याचे मला चांगले ज्ञान आहे. मात्र, हे ज्ञान अशा पध्दतीने उपयोगाला येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझी परिस्थिती नसल्याने मला चांगलं व्यासपीठ मिळू शकलं नाही, असं यापुढे कोणत्याही कुस्तीपटूने म्हणू नये  हाच माझा ही टीम खरेदी करण्यामागचा उद्देश आहे. माझे प्रतिस्पर्धी म्हणून पूरूष टीमओनर्स असल्याने माझ्यावर स्पर्धेत दबाव असणार आहे पण या गोष्टीचा दुसरीकडे मला अभिमानही आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”– सई ताम्हणकर, अभिनेत्री


वाचा: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बनली ‘माधुरी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -