घरमुंबईम्हाडाच्या लेखापालला दोन हजाराची लाच घेताना अटक

म्हाडाच्या लेखापालला दोन हजाराची लाच घेताना अटक

Subscribe

म्हाडा कार्यालयातील विभागीय लेखापाल राशीदअली हैदर शेख याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

म्हाडा कार्यालयातील विभागीय लेखापाल राशीदअली हैदर शेख याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कार्यालयातच ही कारवाई झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती. यातील तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून त्यांनी म्हाडा कार्यालयात निवीदा दाखल केली होती, मात्र त्यांची निवीदा म्हाडाने नामंजूर केली होती. त्यामुळे निविदेसाठी जमा केलेली अनामत रक्कम परत मिळावी यासाठी त्यांनी विभागीय लेखापाल कार्यालयात अर्ज केला होता. ही रक्कम देण्यासाठी लेखापाल राशिदअली शेख यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय त्यांची अनामत रक्कमेचा धनादेश काढला जाणार नाही अशी धमकीच दिली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी राशिदअलीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी मंगळवारी दुपारी या कार्यालयात साध्या वेशात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना राशिदअली शेख याला या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -