घरताज्या घडामोडीशिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर MPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमन पदी

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर MPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमन पदी

Subscribe

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA)ची आज वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची मुंबई प्रीमियर लीग (MPL)च्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमन पदी घोषणा केली. ही निवड बिनविरोधी करण्यात आली. आज या बैठकीला MCAचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मोठी मंडळी या सभेला उपस्थितीत झाली होती.

माजी मुख्यमंत्री-शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकर यांचा MCAच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश झाला आहे. MPLच्या चेअरमनपदी मिलिंद नार्वेकर यांची निवड होणे हे अपेक्षित मानले जात होते. याआधी मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले मिलिंद नार्वेकर आहेत. तसेच त्यांचा गटप्रमुख ते उद्धव ठाकरे यांचे सचिव ते शिवसेना सचिव असा राजकीय प्रवास राहिला आहे. माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी मिलिंद नार्वेकर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी मातोश्रीवर गेले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकर यांच्यावर पडली आणि त्यांची उद्धव ठाकरे यांच्या पीए पदी निवड झाली.


हेही वाचा – PMC बँक-HDIL संदर्भात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -