घरमुंबईबाईकला कट मारला म्हणून तलवारीने वार

बाईकला कट मारला म्हणून तलवारीने वार

Subscribe

बाईकवरून जात असताना दुसऱ्या बाईकस्वाराने कट मारल्याच्या रागातून चार मुलांनी कट मारणाऱ्या बाईकस्वाराला तलवारीने वार करत गंभीर जखमी केलं आहे.

गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चेंबूरमधील डिसुझा वाडी येथे ही घटना घडली. जेसन जेम्स डिसुझा (२३) हा तरूण रात्री गणेश शेट्टी (१९) याला बाईकवरून कट मारून गेला. गणेश याचा जाब विचारण्यासाठी जेसनकडे गेला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रुपांतर मारहाणीत झालं. गणेशने जेसनच्या छातीवर लाथ मारली आणि त्यानंतर त्याच्यावर तलवारीने वार केले.

- Advertisement -

दरम्यान, हल्ला करणाऱ्या मुलांपैकी दोन मुले अल्पवयीन आहेत. या घटनेप्रकरणी सहआरोपी बाळु घोडके (२५), अश्विन साबळे (२२), विजय घोडके (२६) यांना अटक करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिली. याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -