घरमुंबईसंजय निरुपमना मनसेची साथ नाहीच

संजय निरुपमना मनसेची साथ नाहीच

Subscribe

मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात मनसे कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मनसे मराठी द्वेष करणाऱ्या संजय निरुपम यांना साथ न देण्याचा निर्णय घेतला आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा-विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं मत तरी कुणाला द्यायचे असा संभ्रम निर्माण झाला होता.  2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अभिनेते महेश मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना ६६ हजार ८८ मते मिळाली होती. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर-पश्चिम मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही.

या मतदार संघात काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आधीच संजय निरुपम यांच्याविरोधात मनसे असताना मनसेचे कार्यकर्ते त्यांना मत देणार नाही. तसेच राज ठाकरेंनी भाजपाविरोधात भुमिका घेतल्याने युतीच्याही गजानन किर्तीकर यांना ही मते मिळणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

म्हणून संजय निरुपम यांना मनसेची साथ नाही

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना उत्तर भारतीयांच्या मुद्यावर अनेकदा संजय निरुपम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. फेरीवाल्यांच्या मुद्यांवर देखील मनसे आणि संजय निरुपम यांच्यामधील वाद उफाळून आला होता. त्यामुळेच अशा मराठी द्वेष असणाऱ्या तसेच राज ठाकरे आणि मनसेचा तिरस्कार करणाऱ्या संजय निरुपम यांचा प्रचार करणार नाही, तसेच त्यांना मनसैनिक मतदानही करणार नाही अशी भूमिका आता उत्तर पश्चिम मतदारसंघातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

संजय निरुपम यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची मनसेची भूमिका नाही. निरुपम यांचा प्रचार करणार नाही हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. तशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निरुपम यांच्या मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतील इतर मतदारसंघात फिरतील.

– बाळा नांदगावकर, नेते, मनसे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -