घरमुंबईप्रभादेवीच्या साई सुंदर नगरमध्ये ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण; पालिकेकडून परिसर सील

प्रभादेवीच्या साई सुंदर नगरमध्ये ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण; पालिकेकडून परिसर सील

Subscribe

आमदार, नगरसेवकाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळीतील कोरेाना बाधितांची संख्या नियंत्रणात येत असून प्रभादेवीत आता ही संख्या वाढताना दिसत आहे. प्रभादेवीतील सदानंद तांडेल मार्गावरील साईसुंदर नगर येथे मोठ्याप्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत याठिकाणी ५०हून बाधित रुग्ण आढळल्याने अखेर जी-दक्षिण विभागाच्यावतीने साई सुंदर नगरचा परिसरच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत सील करण्यात आला आहे.

आरोग्य शिबिरांचे आयोजन

साईसुंदर नगर इथे म्हाडासह १४ इमारती आहेत. २२ मजली व ८ मजल्याच्या या इमारतीमध्ये सुमारे ३ हजार कुटुंबे राहत आहेत. मागील आठ दिवसांपासून येथील बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जात असून आतापर्यंत ५० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी साई सुंदर नगरचा परिसर सील करण्यात आला आहे. स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांनी येथील सर्व इमारतींमध्ये वैद्यकीय शिबिर आयोजित करून प्रत्येक रहिवाशांची आरोग्य तपासणीची मोहिम राबवली.

- Advertisement -

परंतु आता याबरेाबरच डेग्यू आणि मलेरियाचीही तपासणी आता घरोघरी जावून करण्यावर भर दिला आहे. वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून रुग्णांचा शोध घेण्यात येत असल्याने काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांची कोविड तपासणी करण्यात येत आहे. येथील म्हाडा इमारतीजवळ मोबाईल व्हॅन असून तेथे पाठवून संशयित रुग्णांची तपासणी केली जात असल्याचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

मागील दोन दिवसांपासून हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याने या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे कामा धंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास त्रास होत आहे,अशा कर्मचाऱ्यांना पत्र दिले आहे.

- Advertisement -

ज्याद्वारे आपले क्षेत्र कंटेन्मेंट झोनमध्ये असून आपल्याला कामाला येता येवू शकत नाही,असा पुरावा येथील रहिवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी सादर करता येईल. येथील परिसर सील केल्यामुळे जनतेने महापालिका व पोलिस यांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे.


मूर्तीच्या उंचीवरून सरकारमध्ये गोंधळ, लालबागच्या राजावरून वाढतोय संभ्रम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -