घरमुंबईमुक्ता आणि हमीद दाभोळकर यांना समाजभूषण पुरस्कार

मुक्ता आणि हमीद दाभोळकर यांना समाजभूषण पुरस्कार

Subscribe

जी.एस. महानगर को.ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.सॉलि. गुलाबराव शेळके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विविध मान्यवरांना यंदापासून सॉलि. गुलाबराव शेळके समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे मुक्ता नरेंद्र दाभोळकर आणि डॉ. हमीद नरेंद्र दाभोळकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्याचबरोबरच आदिवासी आरोग्य आणि जनजीवन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या अनिकेत प्रकाश आमटे यांना देखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ जुलै रोजी अहमदनगर येथील ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयात एका खास वितरण समारंभात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

- Advertisement -

सॉलि. गुलाबराव शेळके महानगर बँक सदस्य समाजसेवा संस्था व जीएस महानगर बँक परिवारातर्फे यंदापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींचा गौरव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गुलाबराव शेळके यांनी आपल्या जीवनात केलेले कार्य लक्षात घेता त्यांच्या नावे हे पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. दयानंद डेरे यांनी दिली.

त्यानुसार यंदा एकूण पाच जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली असून त्यात आदिवासी आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या अनिकेत प्रकाश आमटे, अंधश्रध्दा निर्मूलन विभागात काम करणारे मुक्ता आणि हमीद नरेंद्र दाभोळकर, थॅलेसेमिया निर्मूलन करण्यासाठी काम करणार्‍या सुजाता रायकर आणि आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेेरे पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डेरे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. पहिल्यांदाच देण्यात येणार्‍या या पुरस्काराचा वितरण सोहळा रविवारी २८ जुलै रोजी पार पडणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -