घरमुंबईMumbai : 2030 पर्यंत भारताला रेबीजमुक्त..; एक आठवड्यात 15 हजार भटक्या कुत्र्यांचे...

Mumbai : 2030 पर्यंत भारताला रेबीजमुक्त..; एक आठवड्यात 15 हजार भटक्या कुत्र्यांचे करणार लसीकरण

Subscribe

मुंबई : कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्यावतीने 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीदरम्यान पल्स अँटी-रेबीज लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) संस्थेच्या सहकार्याने या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबईतील 15 हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिदिन सरासरी किमान तीन हजार कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणारा आहे. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जुहू चौपाटी येथे मुंबई महापालिकेचे अधिकारी, प्राणी कल्याण संघटनांचे विविध प्रतिनिधी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 2030 पर्यंत भारताला रेबीजमुक्त करण्याचे ध्येय आहे. (Mumbai Aim to make India rabies free by 2030 15 thousand stray dogs will be vaccinated in one week)

हेही वाचा – BJP VS NCP-SP : आता “तुतारी” वाजेल की…; भाजपाच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

- Advertisement -

मुंबईत 2014 च्या गणनेनुसार कुत्र्यांची संख्या 95 हजार आहे. त्यापैकी 25 टक्के (म्हणजे 23,750) कुत्र्यांचे लसीकरण करायला संस्थांना 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. मार्च महिन्यापर्यंत 70 टक्के (म्हणजे 66,500) कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण करायचे होते. म्हणजे उर्वरित 45 टक्के (42,750) लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आता महापालिकेने 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत 15 हजार कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यामुळे 70 टक्के कुत्र्यांचे लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी उर्वरित 27,750 कुत्र्यांचे लसीकरण प्रलंबित राहणार आहे.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अँटी रेबीज लसीकरण मोहीम हा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : “वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी”; निवडणुकीआधीच आव्हाडांचा नवा नारा

भारताला रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सन 2030 पर्यंत कुत्र्यांपासून भारताला रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्या अंतर्गत मुंबई महापालिकेने 2022 मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. रेबीज निर्मूलनासाठी मुंबई महानगरपालिकेने दिनांक 25 जुलै 2023 रोजी वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार केला. याच पार्श्वभूमीवर आता वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज यांच्यासोबत मिळून मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई महापालिका अधिकारक्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या भागातील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी ‘पल्स अँटी रेबीज मोहीम’ राबविण्यात येणार आहे.

दहा विभागांतील भटक्या कुत्र्यांचे होणार लसीकरण

या अंतर्गत 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 दरम्यान रोज सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान के (पूर्व), के (पश्चिम), एच (पूर्व), एच (पश्चिम),एल, एम (पूर्व), एम (पश्चिम),एन, जी (उत्तर) आणि एफ (उत्तर) या 10 प्रशासकीय विभागांमधील सुमारे 15 हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येईल. या मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक, श्वान पकडणारे चमू, मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, वायओडीए, आयडीए, डब्ल्यूएसडी या स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, स्थानिक फीडर्स आणि स्वयंसेवकही सहभागी होतील. प्रत्येक चमूमध्ये वॅक्सीनेटर (पशूवैद्यक/पशूवैद्यकीय परिचारिका), हँडलर (प्रशिक्षित पशूवैद्य सहायक), नेट कॅचर आणि डेटा कलेक्टर यांचा समावेश असेल.

हेही वाचा – Politics : “तुतारी” फक्त स्टेजवर…; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा

अशी असणार लसीकरणाची प्रक्रिया

स्थानिक फीडर्स व स्वयंसेवकांच्या मदतीने कुत्र्यांना पकडणे, रेबीजची लस देणे आणि त्यांच्या कपाळावर लसीकरण झाल्याबाबत चिन्हांकित करणे, अशी ही लसीकरणाची प्रक्रिया असेल. दरम्यान, विभागीय स्तरावर सूक्ष्म व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या के (पश्चिम) आणि एम (पूर्व) या प्रशासकीय विभागांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी लस, लसीकरणाचे साहित्य तसेच साठवणुकीचे साधन आदी साहित्य ठेवण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -