घरक्राइमदाऊद टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 5 जणांना अटक

दाऊद टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 5 जणांना अटक

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दाऊदचा जवळचा साथीदार गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटीला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण आणि अमजद रेडकर या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी गँगस्टर छोटा शकील आणि मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अंधेरी वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 30 लाखांची कार आणि 7.5 लाख रुपयांची रोकड लुटल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.


पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारकडून सीबीआयकडे हस्तांतरणास मंजुरी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -