घरमुंबईCSMT पुल दुर्घटनेला रेल्वे जबाबदार - नगरसेविका सुजाता सानप

CSMT पुल दुर्घटनेला रेल्वे जबाबदार – नगरसेविका सुजाता सानप

Subscribe

सीएसटीएम येथील पादचारी पुल कोसळल्यामुले मुंबईकर पुन्हा एकदा हादरले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता नगरसेविका सुजाता सानप यांनी केला आहे. या पुलाचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी रेल्वे प्रशासनानेकडे वारंवार करण्यात आली होती, मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडला असल्याची माहिती सुजाता सानप यांनी वृत्तवाहिन्याशी बोलताना दिली.

सविस्तर वृत्त – सीएसटी स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळला, दोन महिलांचा मृत्यू

तर दुसऱ्या बाजुला रेल्वेने मात्र आपले हात झटकले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के.जैन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मात्र हा पुल रेल्वेचा नसून सार्वजनिक पादचारी पूल होता, असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -