घरताज्या घडामोडीCorona Update: मुंबईत २४ तासांत ९९१ नव्या रुग्णांची वाढ, ३४ जणांचा मृत्यू!

Corona Update: मुंबईत २४ तासांत ९९१ नव्या रुग्णांची वाढ, ३४ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबई गेल्या २४ तासांत ९९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ३४८ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख १० हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा असून राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३४ हजार ८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या राज्यात १ लाख ७१ हजार ५४२ Active रुग्ण आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा – अ‍ॅण्टिजेन चाचणीवर भर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -