घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : मुंबईतील कोरोनामुक्तांमध्ये घट मृत्यूचा आकडा वाढला, २४ तासात...

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनामुक्तांमध्ये घट मृत्यूचा आकडा वाढला, २४ तासात ६७६ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुबईत आतापर्यंत ७ लाख २३ हजार ५५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून मागील २४ तासात ६७६ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित मत्यूंची संख्या वाढली आहे तर कोरोनामुक्तांच्या संख्येत घट होऊन कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत मागील २४ तासात ६७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत ८ हजार ५९८ कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई सध्या डेल्टा व्हेरियंटच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या लेवलमध्ये आहे यामुळे काही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

मुबईत आतापर्यंत ७ लाख २३ हजार ५५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून मागील २४ तासात ६७६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात एकूण ६ लाख ९७ हजार १४० कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच १५ हजार ४९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मागील २४ तासात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत आतापर्यंत एकूण ७२ लाख १९ हजार ८२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये मागील २४ तासात ३८ हजार ६५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या २७ रुग्णांपैकी १५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १५ रुग्ण पुरुष व १२ रुग्ण महिला होते. २ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. १२ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित १३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ७४४ दिवसांवर आला आहे. सध्या मुंबईत ७१ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -