घरक्राइमMumbai Crime : उच्चभ्रू वस्तीत अंधश्रद्धेची पेरणी; पतीच्या रक्षणासाठी 'तिला' मांत्रिकाने सर्वार्थाने...

Mumbai Crime : उच्चभ्रू वस्तीत अंधश्रद्धेची पेरणी; पतीच्या रक्षणासाठी ‘तिला’ मांत्रिकाने सर्वार्थाने लुटले

Subscribe

मुंबईत वसई येथे एका मांत्रिकाने गुप्त धन, आर्थिक प्रगती तसेच पतीला भूतबाधा आणि वाईट सवईपासून दूर करण्याचे आमिष दाखवत एका ५६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वसई येथे उघडकीस आली आहे.

मुंबई : पुरोगामीत्वाचा आव आणणाऱ्या महाराष्ट्र राज्यात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भोंदू बाबांच्या आहारी जाऊन फसवणूक करून घेणारे कमी नाहीत. असे जरी असले तरी अगदी महानगरीय जीवन जगणाऱ्यांच्या घरातही अंधश्रद्धेची पेरणी केली जात आहे. अशीच एक घटना नवी मुंबईतील वाशी भागात घडली असून, एका महिलेला भोंदू मांत्रिकाने विविध आमिषं दाखवून पैशाने तर लुबाडलेच एवढेच नाही तर तिच्यासोबत नको तेसुद्धा केल्याने मांत्रिकाने त्या महिलेला सर्वार्थाने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. (Mumbai Crime  Sowing superstitions in elite neighborhoods To protect her husband she was robbed by the wizard)

मुंबईत वसई येथे एका मांत्रिकाने गुप्त धन, आर्थिक प्रगती तसेच पतीला भूतबाधा आणि वाईट सवईपासून दूर करण्याचे आमिष दाखवत एका ५६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वसई येथे उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर मांत्रिकाने या महिलेला ब्लॅकमेल करत तिच्या कडून 78 लाख लुबाडले.
नीलेश हातवाल असे आरोपी मांत्रिकाचे नाव असून, याप्रकरणी महिलेच्या पतीने वसई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : LOKSABHA ELECTION 2024: कोण पुरुष, कोण युगपुरुष ते 2024ला कळेल; राऊतांचा उपराष्ट्रपतींना टोला

मुलीच्या निदर्शनास आल्या सर्व गोष्टी

पीडित महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेचा उलगडा हा पीडितेच्या मुलीने केला असून, जेव्हा पीडित महिलेला पक्षाघाताचा झटका आला तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी पीडितेच्या मुलीला त्यांच्या घरात घरी, लिंबू, मिरची तेसच जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. या सर्व साहित्यासोबतच पीडितेच्या मुलीला घरात एक डायरी सापडली असून, ज्यामध्ये लाखोंचे व्यवहार, काही लोकांची नावे आणि त्यांच्या कुंडल्या सापडल्यानंतर तिने हा सगळा प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

हेही वाचा : Lalit Patil Drug Case : ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

अघोरी कृत्यासाठी देशभर भ्रमंती

पीडितेच्या मुलीला सापडलेल्या डायरीत फेब्रुवारी 2023 पासून आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आढळून आल्या. सोबतच मांत्रिक नीलेश हातवाल आणि त्याचे आणखी सात साथीदार यांची नावे लिहलेली आढळून आली. एवढेच नव्हे तर पीडित महिलेला मांत्रिकांने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही फिरवल्याच्या नोंदी आढळून आल्या. तेव्हा हा प्रकार किती घृणास्पद होता हे यातून दिसून येते.

अद्यापही एकालाही अटक नाही

पीडितेचे फसवणूक आणि बलात्कार करणाऱ्या आरोपी नीलेश हातवाले याच्यासह त्याची पत्नी अर्चना हातवाले, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नानाभाऊ, भक्ती आणि अनुसया कांबळे असे आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालीह अटक करण्यात आली नसून, पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -