घरमुंबईतिवरे धरण प्रकरण : गणेशगल्ली मंडळाकडून ३२ कुटुंबांना मदत

तिवरे धरण प्रकरण : गणेशगल्ली मंडळाकडून ३२ कुटुंबांना मदत

Subscribe

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्लीने) तिवरे धरणातील कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. एकूण ३२ कुटुंबाला गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्लीने) तिवरे धरणातील कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. या दुर्घटनेत पीडितांना मदत करण्यासाठी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे. या मंडळाकडून ५ लाखापर्यंतच्या गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सदस्यांनी गुरुवारी चिपळूण येथे भेट देऊन या दुर्घटनेत उद्धवस्त झालेल्या ३२ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना मदत केली आहे. चिपळूण रत्नागिरी तालुक्यातील तिवरे धरणाला भगदाड पडून धरण फुटल्याची दुर्दैवी घटना २ जुलै रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

५ लाखांच्या साहित्याचे केले वाटप

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून तिवरे धरणात नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत केली आहे. या कुटुंबांना कपडे, धान्य आणि गरजेच्या इतर वस्तूंचे गुरुवारी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून वाटप करण्यात आले आहे. भांडी, चादर, तेल, कडधान्य आणि कपडे अशा २७ प्रकारच्या गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हे वाटप करण्यात आले असून यावेळी मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब, उपाध्यक्ष संजय सावंत, तहसिलदार जीवन देसाई, शांताराम चव्हाण, अशोक नलावडे, ग्रामस्थ मंगेश शिंदे, शैलेश शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मंडळाविषयी थोडक्यात

सर्वात उंच गणपतीची मूर्ती असलेले मंडळ म्हणून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची ओळख आहे. यंदा या मंडळाचे ९२ वे वर्ष आहे. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक गणेशमंडळातर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे.


हेही वाचा – तिवरे धरण दुर्घटना: बाधितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत करा – शरद पवार

- Advertisement -

हेही वाचा – तिवरे धरण दुर्घटना; तो मृतदेह तिचा नसून प्राण्याचा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -