लोकलवरील दगडफेक रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक तैनात

लोकलवर दगडफेकीच्या घटना या मार्च महिन्यापासून घडतं आहे. या चार महिन्यात एकूण १३ दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनेवर आळा घालण्याकरिता रेल्वे राखीव पोलीस दलातील २४ जणांच्या पथकाची मध्य रेल्वेने स्थापना केली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकलवर दगफेकीच्या घटना वाढत आहेत. लोकलवर एकूण १३ दगडफेकीच्या घडल्या आहेत. या घटना सर्वात जास्त कांजुरमार्ग ते कुर्ला स्थानकादरम्यान घडल्या आहेत. त्यामुळे या घटनेवर आळा घालण्याकरिता मध्य रेल्वेने रेल्वे राखीव पोलीस दलातील २४ जणांच्या पथकाची स्थापना केली आहे. हे पथक रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर गस्त घालणार असून यात स्थानिकांची मदत घेणार आहे. या घटनांवर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार आहे.

मार्च महिन्यापासून या घटना घडायला सुरूवात झाली. या चार महिन्यांत एकूण १३ दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त के.के.अश्रफ यांनी असे सांगितले की, अशा घटनांबाबत प्रवाशांनीही जागरूक राहण्याकरिता मोहीम राबवण्यात येणार आहे. या घटनांमध्ये लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांना खूप जोरात दगड लागतो. यामुळे ती व्यक्ती गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. म्हणून या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज देखील आहे, असे सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी सांगितले.

आरपीएफ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दगडफेकीच्या घटना वाढण्याचे कारण फटका गँग आहे. कारण फटका गँगवर कारवाई केल्यामुळे या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेस लोकल्या दरवाज्यावर असलेल्या प्रवाशांनावर फटका गँग लक्ष केंद्रीत करत असतं. कुर्ला ते कांजूरमार्गदरम्यान फटका गँगचा प्रभाव जास्त असल्याचे दिसून येते. या फटका गँगने पोलिसांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पळवाट काढली. म्हणून त्यांनी आता दगडफेकीच्या घटनांना सुरुवात केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.