घरताज्या घडामोडीMumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

Mumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

Subscribe

हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) ते बोरिवली असा प्रवास करणे शक्य होणार आहे.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) ते बोरिवली असा प्रवास करणे शक्य होणार आहे. हार्बर रेल्वेचा सीएसएमटी ते पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकापर्यंत विस्तार करण्याचा प्रकल्पाला आता गती मिळाली असून येत्या 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतूक सुरू केली जाईल, असा दावा पश्चि रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (Mumbai Local Train Western Railway Plans To Extend Harbor Line Up To Borivali)

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते बोरिवली हार्बर मार्गाकरीता भू-तांत्रिक तपासणी, ड्रोन सर्वेक्षण, बाधित बांधकामे सर्वेक्षण, वृक्षतोड सर्वेक्षण ही कामे वेगाने पूर्ण झाली असून, कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी आणि गोरेगावपर्यंत लोकल धावते. याआधी हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल केवळ सीएसएमटी – अंधेरी स्थानकादरम्यान सुरू होती.

- Advertisement -

मात्र, हार्बर मार्गावरील लोकल केवळ अंधेरीपर्यंत धावत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील प्रवास वेगळ्या लोकलमधून करावा लागत होता. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. त्या मागणीची सकारात्मक दखल घेत रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वे मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार केला. त्यानंतर आता बोरिवलीपर्यंत होणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा – Mumbai Local: रेल्वेचे महिलांना सुरक्षा कवच; लोकलमध्ये मिळणार ही सुविधा

- Advertisement -

हार्बर रेल्वे मार्गाच्या अंधेरी ते गोरेगाव विस्तारीत प्रकल्पाची घोषणा 2009 साली करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाचे काम 2017 साली पूर्ण झाले. त्यानंतर एप्रिल 2018 पासून हार्बर लोकल गोरेगावपर्यंत लोकल धावू लागली. तर, आता हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याची योजना असून यासाठी 825.58 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय, गोरेगाव ते बोरिवली 7.08 किलोमीटर रेल्वेमार्ग विस्तारीकरण आणि 16 उप-रेल्वेमार्ग तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभियांत्रिकी कामासाठी सल्लागाराची नियुक्ती आणि निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सीएसएमटी ते गोरेगाव प्रकल्पाचे नकाशे तयार झाले असून खासगी भूसंपादनासाठी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे. सरकारी भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादन पूर्ण झाल्यावर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यास ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार असून जून 2027 पर्यंत या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – BEST BUS : प्रवाशांसाठी त्रासदायक! बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -