घरमुंबईआमदार राहुल नार्वेकर आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत

आमदार राहुल नार्वेकर आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल नार्वेकर यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. आमदार राहुल नार्वेकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि भाऊ मकरंद नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे नार्वेकर कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. नार्वेकर कुटुंबीयांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

लेटर हेडचा चुकीचा वापर करत नार्वेकर कुटुंबीयांनी त्याच्यावर सह्या करुन अनेक कामं केल्याचा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी नार्वेकर कुटुंबीयांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. त्यांनी यासंदर्भात सर्व पुराव्यासह मुंबईचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत सह्यांची पडताळणी करा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहेत.

- Advertisement -
अपर जिल्हादंडाधिकारी यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

नार्वेकर कुटुंबिय राजकारणात

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या वार्ड क्रमाक २२६ च्या नगरसेवका आहेत. तर त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर २२७ चे नगरसेवक आहेत. नार्वेकर कुटुंबियातील तीन व्यक्ती राजकारणात असून या तिघांनी देखील आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -