घरमुंबईMumbai News : क्लीनअप मार्शलने मोबाइल ऍपद्वारे केली 2800 रुपयांची दंड वसुली

Mumbai News : क्लीनअप मार्शलने मोबाइल ऍपद्वारे केली 2800 रुपयांची दंड वसुली

Subscribe

'क्लीनअप मार्शल'ने पहिल्याच दिवशी म्हणजे आज बुधवारी (ता. 03 एप्रिल) सायंकाळपर्यंत मोबाइल ऍपचा वापर करून प्रारंभी महापालिकेच्या 'ए ' वॉर्डात 15 प्रकरणात कारवाई करून दोन हजार 800 रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे.

मुंबई : मुंबईला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. मुंबईत कुठेही थुंकणे, कचरा टाकणे, घाण करणे आदी बाबींना रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा ‘क्लीनअप मार्शल’ अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘क्लीनअप मार्शल’ने पहिल्याच दिवशी म्हणजे आज बुधवारी (ता. 03 एप्रिल) सायंकाळपर्यंत मोबाइल ऍपचा वापर करून प्रारंभी महापालिकेच्या ‘ए ‘ वॉर्डात 15 प्रकरणात कारवाई करून दोन हजार 800 रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे. तसेच, घाण करणाऱ्या दोषी नागरिकांना डिजीटल पद्धतीने दंडाची पावती देण्यात येत आहे. त्यामुळे दंड वसुली करताना होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. (Mumbai News : Cleanup marshal collects fine of Rs 2800 through mobile app)

हेही वाचा… मीरा -भाईंदर महापालिकेची १९३ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली

- Advertisement -

सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे किमान 100 रूपये तर कमाल एक हजार रूपये इतका दंड आकारण्याचे अधिकार क्लिनअप मार्शल यांना असणार आहेत. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर आर. ए. राजीव हे 2006 मध्ये कार्यरत असताना मुंबई महापालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबई शहर बनविण्यासाठी ‘क्लीनअप मार्शल’ अभियान सुरू केले. याद्वारे सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या परिसरात, रस्त्यावर, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात, चौकात अथवा उघड्यावर कुठेही थुंकणे, लघुशंका करणे, घाण, कचरा टाकणे, डेब्रिज टाकणे आदी घटनाप्रकार घडल्यास संबंधित व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची पद्धती सुरू करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र काही ठिकाणी दंड वसुली करताना क्लीनअप मार्शल अरेरावी व दमदाटी करतात, हाणामारी करतात, नाहक लोकांना त्रास देतात, दंड वसुली करताना त्यामध्ये भ्रष्टाचार करतात, असे अनेक आरोप नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सामान्य नागरिक आदींनी केल्याने पालिकेने मध्यंतरी सदर अभियान गुंडाळले होते. नंतर पुन्हा अभियान सुरू केले व पुन्हा तक्रारी आल्याने पुन्हा कारवाई व कार्यपद्धती बंद करण्यात आली होती. अगदी मुंबईत कोविड संसर्ग सुरू झाल्यावर घराबाहेर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठीही क्लीनअप मार्शलचा वापर करण्यात आला होता.

मात्र आता पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल अभियान राबविताना भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पालिकेने ऑनलाइन दंड रक्कम भरणे आणि डिजिटल पद्धतीने दंड भरल्याची पावती मोबाईल ऍपद्वारे देणे, अशी काहीशी चांगली उपाययोजना केल्याने आता या अभियानाच्या अंतर्गत घाण करणाऱ्यांकडून दंड रक्कम वसूल करताना भ्रष्टाचार होण्याची शक्यता कमी होणार आहे.

स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत अधिकाधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घ्यावेत, अधिकाधिक पारदर्शक यंत्रणा राबवावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार माहिती तंत्रज्ञानावर आधारित दंडात्मक आकारणीची सुरूवात क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर संपूर्ण मुंबईत या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा… Mumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -