घरताज्या घडामोडीCorona restrictions: परिस्थितीनुसार कोरोना निर्बंधांवर निर्णय, अजित पवारांचा इशारा

Corona restrictions: परिस्थितीनुसार कोरोना निर्बंधांवर निर्णय, अजित पवारांचा इशारा

Subscribe

जगात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग पसरल्यानंतर भारतातही रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात परदेशातून आलेले प्रवासी ओमिक्रॉनबाधित सापडले होते. यामधील मुंबई आणि पुण्यातील ५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार का? अशी चर्चा सुरु आहे. परंतु तुर्तास कोणताही निर्बंध लागू करण्याचा निर्णय झाला नसून लागू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवार यांना राज्यातील निर्बंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तरात ते म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी सध्या राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही आहे. तुर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. या आठवड्याचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनावरील निर्बंध लागू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात यावेत अशी सूचना दिली होती. परंतु स्थानिक पातळीवर ५ लोकांमध्ये ४ लोकांचा वेगळा आणि एकाचं वेगळं मत असेल तर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यपातळीवर घेण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले आहेत.

बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा

बुस्टर डोसबाबत प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा दोन डोस कसे देता येईल यावर भर दिला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास होत नाही असे सिद्ध झाले आहे. काही ठिकाणी बुस्टर डोस घेतले त्यांना त्रास झाला आहे. परंतु बुस्टरचा डोस देण्याचा निर्णय देश पातळीवर घेण्यात येईल. तिसऱ्या डोसचे व्हॅक्सिन सिरमकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्याबाबत निर्णय घ्यावा असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या परीक्षेप्रकरणी दोषींवर कडक कारवाई

आरोग्य विभागाच्या परीक्षांदरम्यान पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले. आरोग्य विभागाची परीक्षा मोठी आहे. अशी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे शक्य नाही. एमपीएससीकडे हजारो पद भरण्याचे काम सुरु आहे. आरोग्य भरती गैरप्रकार आणि पेपर फोडण्यावर कारवाई सुरु आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशी कारवाई करु की पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेण्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल असे अजित पवार म्हणाले आहेत.


हेही वाचा : पुण्यातील ५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त, दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -