घरमुंबईगिरगाव चौपाटीला पोलिसांची बोट बुडाली

गिरगाव चौपाटीला पोलिसांची बोट बुडाली

Subscribe

गिरगाव चौपाटी येथे पोलिसांची एक बोट बुडाली आहे. या बोटीमध्ये सहा पोलीस कर्मचारी होते.

दरवर्षी नववर्षच्या स्वागतासाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो लोकांची गर्दी जमते. त्यामुळे किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. यावर्षी देखील असाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी ३१ डिसेंबरच्या रात्री गिरगाव चौपाटी येथे पोलिसांचे एक पथक बोटीमार्फत गस्तीनौकापर्यंत जात होते. यावेळी ही बोट बुडाली. या बोटीत सहा पोलीस कर्मचारी होते. यातील एक जण जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली; सुदैवाने अनर्थ टळला

- Advertisement -

जीवरक्षकाने वाचवला प्राण

नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने कितीतरी नागरीक मुंबई चौपाटीवर येतात. नववर्षानिमित्ताने चौपाटीवर जल्लोष साजरा करतात. नववर्षानिमित्ताने याठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी होते. हीच आतषबाजी बघण्यासाठी मोठी गर्दी जमा होते. या गर्दीच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी मुंबई पोलिसांची असते. २६/११ च्या हल्ल्यावेळी अतिरेकी समुद्र मार्गानेच आले होते. त्यामुळे रात्रीच्या समयी नववर्षानिमित्ताने समुद्र किनारी गोळा झालेल्या नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर होती. यावेळी पोलिसांचे एक पथक गस्तीनौकेपर्यंत जाण्यासाठी एका बोटीने जात होते. यावेळी ती बोट समुद्रामध्येच बुडाली. या घटनेचा सुगावा लागताच जीवरक्षक प्रतीक वाघे बोटीच्या मदतीसाठी गेला. ही बोट किनाऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर होती. दरम्यान पोलिसांची दुसरी गस्तनौका कर्मचाऱ्यांच्या मदतसीसाठी पोहचली. प्रतीक वाघेच्या मदतीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. यातील एका पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – आसामच्या ब्रम्हपूत्रा नदीत प्रवासी बोट बुडाली; एकाचा मृत्यू

- Advertisement -

पोलीसांकडे लाईफ जॅकेट नव्हते

काही दिवसांपूर्वी समुद्रात उभारले जाणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रम आमदार विनायक मेटे यांनी आयोजित केला होता. यावेळी देखील एक बोट बुडाली होती. त्यावेळी देखील बोटीत लाईफ जॅकेट नव्हते. आज पुन्हा तशीच घटना घडली आहे. या सहाही पोलीस कर्मचाऱ्यांकडे लाईफ जॅकेट नसल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – शिवस्मारकाच्या पायाभरणी शुभारंभाला जात असताना अशी बुडाली बोट…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -