घरमुंबईमुंबई पोलिसांची 'धूम' दुचाकीस्वारांवर कारवाई, 10 अल्पवयीन मुलांसह 84 तरुणांना अटक

मुंबई पोलिसांची ‘धूम’ दुचाकीस्वारांवर कारवाई, 10 अल्पवयीन मुलांसह 84 तरुणांना अटक

Subscribe

मुंबई : बाईक रेसिंग (Bike racing) टोळ्यांच्या विळख्यातून मुंबईला वाचवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या टोळ्यांवर कारवाई करताना 10 अल्पवयीन मुलांसह तब्बल 84 तरुणांना अटक केली आहे. यासोबतच 48 मोटारसायकल आणि स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व तरुणांवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याची कलमे लावली आहेत. विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कैलाश अवध यांनी सांगितले की, बाईक चालवणाऱ्यांना रोख बक्षिसे जिंकण्यासाठी बाईक रेसिंग उपक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगणारी एक इस्टाग्राम पोस्ट पोलिसांनी पाहिली. याशिवाय अनेकांनी ट्विटरवर या रेसर्सच्या टोळ्यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.

पोलिसांनी सांगितले की, वांद्रेजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Western Express Highway near Bandra) मोटारसायकल रेसर्स अनेकदा स्टंट करताना दिसून आले आहेत. यादरम्यान रेसिंगवर सट्टा लावणे तसेच रस्त्याच्या एका बाजूने ये-जा करणाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे आणि रेसर बाईकचे सायलेन्सर बदलून कान फुटणारे आवाज येणारे सायलेन्सर बसवण्याच्या तक्रारी रिक्षाचालकांकडून करण्यात आल्या होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेक बाईक रेसर्स गोंधळ घालत आहेत. या रेसर्सकडून ऑटो चालकांनाही मारहाण करण्यात आली आहे. अशा दुचाकीस्वारांची मनमानी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी पद्धतशीरपणे कारवाई केली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून 84 जणांवर कारवाई
बाईक रेसिंगमध्ये सहभागी तरुणांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी सहा पथके तयार करून आसपासच्या सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सतर्क केले. यानंतर पोलिसांनी मिलन सबवे आणि खेरवाडी जंक्शनजवळ महामार्गाची दोन्ही टोके बंद केली आणि नियम झुगारून धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडले. यावेळी तब्बल 84 तरुणांना अटक करण्यात आली असून 48 मोटारसायकल आणि स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यात 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यावेळी जप्त केलेली वाहने चोरीची आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय बाईक रेसर्स महामार्गावर बाईक रेसिंगच्या माध्यमातून जुगार खेळत होते. त्यामुळे पोलिसांनी 84 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा लागू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -