घरमुंबईसोनम कपूर आणि मुंबई पोलीसांमध्ये रंगला ट्विटर वॉर

सोनम कपूर आणि मुंबई पोलीसांमध्ये रंगला ट्विटर वॉर

Subscribe

मुंबई पोलिसांन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडियोवर अभिनेत्री सोनम कपूरनेही कमेंट केली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि मुंबई पोलिसांमध्ये सध्या ट्विटर वॉर सुरु असल्याचे  दिसून आले आहे. मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विटकरून असे करू नका असा संदेश लोकांना दिला होता. यानंतर सोनमने त्यावर प्रत्योत्तर देत आपली बाजू मांडली होती. सोनमने आपल्या अधिकृत अकाऊंटमधून मुंबई पोलिसांना उत्तर दिल्यामुळे अचानक सोनमला काय झाले याची चर्चा सुरु होती. मुंबई पोलिसांनी अभिनेत्री सोनम कपूरने शुटिंग केलेला दलकेर सलमानचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटरवर टाकला होता. वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करु नका असा संदेश पोलिसांनी या व्हिडिओवरून दिला होता. व्हिडिओला पोलिसांनी “व्हिअर्डो स्टंट” (विचित्र स्टंट) असे नाव दिले होते. असा स्टंट करुन स्वःताचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन पोलिसांनी केले होते. यालाच कमेंट करत सोनम कपूरने हा स्टंटनसल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

काय म्हणाली सोनम 

आपल्या सहकलाकाराची बाजू घेत सोनमने ट्विटरवरूनच स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही खरोखर गाडी चालवत नव्हतो. आमची गाडी एका ट्रकवर होती आणि तो ट्रक धावत होता. मात्र मला आनंद आहे की तुम्ही माझी चिंता केली. माझी काळजी करण्यासाठी धन्यवाद.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -