घरताज्या घडामोडीमुसळधार पावसाने आज गोविंदांसह मुंबईकर सुखावले

मुसळधार पावसाने आज गोविंदांसह मुंबईकर सुखावले

Subscribe

सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यातच दहीहंडी उत्सवाचा जोश आणि मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाची बरसात झाल्याने गोविंदा, मुंबईकर हे काहीसे सुखावले आहेत. गल्लीतील गोविंदांनी पावसात चिंब भिजून दहीहंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत शहर भागात २०.८२ मिमी पाऊस पडला तर पूर्व उपनगरात ४०.२६ मिमी आणि पश्चिम उपनगरात ३९.५२ मिमी इतका म्हणजे शहर भागातील पावसापेक्षा उपनगरात दुप्पट पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

त्याचप्रमाणे, सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत शहर भागातील भायखळा येथे ४८ मिमी, दादर-४७ मिमी, रावळी कॅम्प-वडाळा – ४४ मिमी, पश्चिम उपनगरे भागातील गोरेगाव येथे- ७६ मिमी, कांदिवली -६० मिमी, विलेपार्ले – ६१ मिमी, दहिसर – ५९ मिमी, वर्सोवा – अंधेरी – ५५ मिमी आणि पूर्व उपनगरे भागातील विक्रोळी येथे सर्वाधिक ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, चेंबूर येथे ८५ मिमी, गोवंडी -मानखुर्द – ७० मिमी, कुर्ला – ६५ मिमी व भांडुप – ६० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

- Advertisement -

सुदैवाने आज सकाळी ६.०२ वाजताच्या सुमारास समुद्राला छोटी भरती होती व त्यावेळी समुद्रात ३.१२ मिटर उंचीच्या लाटा उसळल्या. अन्यथा जोरदार पावसात समुद्राला मोठी भरती येऊन ४.५० मिटर उंचीच्या लाटा उसळल्या असत्या तर शहर व उपनगरात सकल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असते. तसेच मुंबईचे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर म्हणजेच जनजीवन विस्कळीत झाले असते. दरम्यान, आगामी २४ तासांत मुंबई शहर व उपनगरे भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


हेही वाचा – हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -