घरमुंबई‘मुंबई बुडवून दाखविली हे मान्य करून शिवसेनेने माफी मागावी’

‘मुंबई बुडवून दाखविली हे मान्य करून शिवसेनेने माफी मागावी’

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टिकास्त्र

दुःख म्हातारी मेल्याचं नाहीकाळ सोकावल्याचं आहे. असे ट्विट करत पावसात मुंबईकरांचे जे हाल झालेत त्याबद्दल शिवसेनेने माफी मागायला हवी अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

जनजीवन ठप्प झालंय. मात्र मुंबई कुठे तुंबलीअसा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतातहे संतापजनक आहे.’ मालाडकल्याणपुण्यात भिंत कोसळून २५ बळी गेलेत. मुंबईत रस्ते वाहून गेलेत. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार कारणीभूत नाही का? कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना क्लीन चीट‘ देईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का?पुन्हा अशा घटना घडणार नाहीत,याची हमी मिळणार आहे का?’ असा प्रश्न श्री चव्हाण यांनी आपल्या ट्विटद्वारे केला आहे.

- Advertisement -

उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरात प्रचंड पाणी साचलंय. तळमजल्यावर राहणारे लोक आपलं किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवताहेत. किमान ते बघून तरीआम्ही मुंबई बुडवून दाखवली‘ हे मान्य करून शिवसेनेनं जनतेची माफी मागितली पाहिजे. मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक व बाहेरगावचे प्रवासी अडकून पडले आहेत. मदत तर सोडाच पण रेल्वे केव्हा सुरळीत होईलयाची साधी माहितीसुद्धा त्यांना मिळत नाहीये. लोक प्रचंड हालापेष्टा सहन करताहेत. सरकारने युद्धस्तरावर उपाय करून हे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतीलयासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -