घरमुंबईमहापालिका आयुक्त खोटारडे! मृत्यूचे आकडे लपवले; किरीट सोमय्या यांचा घणाघात

महापालिका आयुक्त खोटारडे! मृत्यूचे आकडे लपवले; किरीट सोमय्या यांचा घणाघात

Subscribe

मुंबईतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. महानगरपालिका आयुक्त कोविड-१९ रूग्णांच्या मृत्यूचे आकडे लपवत असून ते खोटारडे आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. ‘गव्हर्नन्स नाऊ’चे व्यवस्थापकीय संचालक कैलाश अधिकारी यांच्यासोबतच्या विशेष चर्चेत सोमय्या यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

धारावीमधील कोरोना संक्रमणाला नियंत्रित करण्यात महानगरपालिकेने यश मिळवले, याविषयी विचारलेल्या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ‘मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. रूग्णांच्या मृत्यूचे खरे आकडे प्रशासन लपवत आहे. योग्य माहिती मिळत नसल्याने लोकांना अचडणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आपल्यावरील जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली नाही. खरी आकडेवारी लपवून आयुक्त खोटे बोलले. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या तर वाढली आहेच, पण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक पोलीस, महानगरपालिका कर्मचारी तसेच निर्दोष सर्वसामान्य नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला. हे महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाचे घोर अपयश आहे.’

- Advertisement -

एका प्रश्नाच्या उत्तरात सोमय्या म्हणाले, ‘मी भारतीय जनता पक्षाची मनापासून सेवा केली आहे. पक्ष अडचणीत असताना मी पहाडासारखा पक्षासाठी उभा राहिलो. पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करत आहे. याचा मला राजकीय फायदा व्हावा म्हणून मी कोणतेही काम करत नाही. सध्याचे सरकार आपल्यावरील जबाबदारी नीट पार पाडत नाही. उलट हे सरकार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये निराशा आहे. लाखोंच्या संख्येने लोकांना चालत जात स्थलांतरीत व्हावे लागले. अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला. या काळात प्रशासन आहे, असे म्हणणेसुद्धा हास्यास्पद ठरेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

‘मुंबई, मीरा रोड, भाईंदर, विरार, ठाणे आदी परिसरातील लोकांना होणारा त्रास शब्दात वर्णण करता येण्यासारखा नाही. सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रशासन दाबत आहे. वस्तुनिष्ठ आकडे लोकांसमोर आले, तर हे सरकार जनतेला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही,’ या शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

हेही वाचा –

UGC Exam Guidelines: सर्वोच्च न्यायालयात अंतिम वर्षाच्या परीक्षांची सुनावणी लांबणीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -