घरमुंबई'गारगाई' ४२६ हेक्टर जागेची महापालिकेला गरज

‘गारगाई’ ४२६ हेक्टर जागेची महापालिकेला गरज

Subscribe

गारगाई पाणी प्रकल्प राबवण्यासाठी वाडा तालुक्यातील ओगदे आणि खोडदे गावातील जमिन महापालिकेच्यावतीने ताब्यात घेतली जात आहे. यासाठी ४२६ हेक्टर भूखंड ताब्यात घेतला जाणार असून हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी १४७.७९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई प्राणी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर होणार आहे. या प्रकल्पांतर्गत गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे आणि ९७२ मीटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. तसेच आदान मनोर्‍याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशया दरम्यान अंदाजे २ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे बांधकाम या कामांचा अंतर्भाव आहे. या गारगाई पाणी प्रकल्पातून प्रतिदिन मुंबईला ४४० दशलक्ष लिटर्स एवढा पाणी पुरवठा मुंबईला होणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयात आणून जलवाहिनीद्वारे मुंबईत आणले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी बाधित होणार्‍या एकूण ८४० हेक्टर क्षेत्रापैकी नदीखालील ७३ हेक्टर जमीन वगळता ५९७ हेक्टर एवढी वनजमिन असून सुमारे १७०हेक्टर जमिन खासगी आहे. तसेच गारगाई प्रकल्पाचे क्षेत्र हे तानसा वन्यजीव अभयारण्याचा विस्तारीत क्षेत्रात मोडत आहे. तसेच एकूण ६१९ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुमारे ३६५ हेक्टर जागा वाडा-मनोर मार्गाजवळील देवळी गावाजवह प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. यासाठी प्रकल्पबाधित खासगी जागा सुमारे १७० हेक्टर आणि अंशत: बाधित खासगी जागा सुमारे २५६ अशाप्रकारे एकूण ४२६ हेक्टर एवढी जागा खासगी जमिन महापालिका ताब्यात घ्यावी लागणार आहे. ५ लाख ९३ हजार ६५० रुपये प्रति हेक्टर या दराने ही ४२६ हेक्टर जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला १४७.७९ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -