घरमुंबईमहापालिका तयार करणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भूमिगत मार्ग

महापालिका तयार करणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भूमिगत मार्ग

Subscribe

भूमिगत मार्ग फिल्मसिटी-गोरेगाव ते अमरनगर-मुलुंड या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बनवण्यात येणार आहे. या भूमिगत मार्गाच्या प्रस्तावाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली होती.

मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे (जीएमएलआर) काम हाती घेण्यात आले असून या मार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली भूमिगत मार्ग (बोगदा) बनवला जाणार आहे. या बोगदा मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्टी सोसायटी अर्थात बीएनएचएस या संस्थेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी पर्यावरणीय अभ्यासाच्या कार्यवाहीला सुरुवात

मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांना जोडणारा आणि तीन टप्प्यात राबवल्या जाणार्‍या या लिंक रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामाला नाहूर परिसरात सुरु झाले. तर पूर्व द्रुतगती महामार्ग ते आरे कॉलनी या परिसरातील कामालाही सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात उड्डाणपूल, तर तिसर्‍या टप्प्यात भूमिगत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यासाठी पर्यावरणीय अभ्यासाच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

तिसऱ्या टप्प्यात भूमिगत मार्ग बनवणार

तिसर्‍या टप्प्यातील भूमिगत मार्ग फिल्मसिटी-गोरेगाव ते अमरनगर-मुलुंड या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बनवण्यात येणार आहे. या भूमिगत मार्गाच्या प्रस्तावाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली. या मंडळाने घातलेल्या अटींनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार्‍या या भूमिगत मार्गाच्या बांधकामामुळे तसेच या मार्गावरील वाहतुकीमुळे या परिसरातील जैवविविधतेवर होणार्‍या परिणामावर अभ्यास करून त्यावर प्रतिबंधक उपाय सुचवण्यासाठी सक्षम संस्थेमार्फत अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जैवविविधतेचा अभ्यास आणि प्रकल्पाच्या बांधकाम काळात आणि त्यानंतर भूमिगत मार्गावरील वाहतुकीमुळे जैवविविधतेवर होणार्‍या प्रतिकूल आघातांवर उपाययोजना सूचविणे आदी कामांसाठी बॉम्बे नॅचरल हिस्टी सोसायटी या संस्थेची निवड करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. या अभ्यासासाठी संस्थेला महापालिकेच्यावतीने सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -