घरमुंबईपूरग्रस्तांना नगरपालिका देणार दाखले

पूरग्रस्तांना नगरपालिका देणार दाखले

Subscribe

बदलापुरात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी संध्याकाळपर्यंत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर आता नागरिकांचे झालेले नुकसान समोर येत आहे. अशा नागरिकांना नगरपरिषदेमार्फत पूरग्रस्त दाखला देण्यात येणार असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.

बदलापुरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शहराच्या अनेक भाग जलमय झाले होते. काही भागात तर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचले होते. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही नागरिकांची महत्वाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत वा वाहून गेली आहेत. अनेक जण या परिस्थितीमुळे कामावर पोहचू शकले नाहीत. अशा नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी नगर परिषदेमार्फत पूरग्रस्त नागरिकांना ‘पूरग्रस्त दाखला’ देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सांगितले. हे दाखले घेण्यासाठी संबंधितांना मालमत्ता कराची पावती, लाईट बिल, भाड्याने रहात असल्यास भाडे करार वा शासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याची प्रत आदी वास्तव्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत.

- Advertisement -

मालमत्ता कर ऑनलाइन असल्याने त्याची पावती नगर परिषद कार्यालयाकडूनही घेता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सन 2005 मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती नंतर शासनाने पंचनामे व मदत नगर परिषदेमार्फत दिली होती. यावेळी शासनाचे पथक हे काम करणार असून त्यासाठी नगर परिषदेने 10 कर्मचारी उपलब्ध करून दिले असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले.

पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबिर
पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रत्येक भागात वैद्यकीय तपासणी शिबिर लावण्यात येणार आहे. शासनाच्या 10 डॉक्टरांचे पथक हे काम करणार असून नगर परिषदेच्या दुबे रुग्णालयाचे 2 डॉक्टरही त्यामध्ये असणार आहेत.

- Advertisement -

शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन सज्ज
पूरपरिस्थिती नंतर शहरात निर्माण झालेला कचरा, चिखल, गाळ आदी हटविण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. 11जेसीबी, 27 पाण्याचे टँकर व 100 कर्मचारी या कामात लावण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -