घरमुंबईमोबोईल विरहामुळे मुलीची आत्महत्या

मोबोईल विरहामुळे मुलीची आत्महत्या

Subscribe

या पूर्वी प्रवासात असताना माणसे एकमेकांशी बोलण्यात गुंगलेली असायची किंवा पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. मात्र आता हीच माणसे सतत मोबाईल बघत असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यामध्ये गुंतलेली असतात. तर काही ठिकाणी कानात इअरफोन्स लावून बसलेले असतात. यामुळे आसपासच्या जगाशी संबंध नसल्यासारखे वावरतात. मोबाईल ही माणसांची आतापर्यंत गरज होती. परंतु गरजेचे रुपांतर आता व्यसनात झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोबाईल व्यतिरिक्त जगणे देखील माणसांना नकोसे झाले असल्याचा अनुभव नालासोपाऱ्यामध्ये दिसून आला. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीकडून वडिलांनी मोबाईल काढून घेतल्यामुळे मुलींने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नालासोपारा येथे ढवळे हे कुटुंब राहते. या कुटुंबातील श्रद्धा ढवळे (२२) ही मुलगी जास्त वेळ मोबाईवर घालवायची. काळजीपोटी सतत तिला बजावूनही ती कोणाचे ऐकत नव्हती. मोबाईलवर जास्त घालवणे, तिच्या वडिलांना आवडत नव्हते. त्यामुळे त्यांनी सोमवारी सोमवारी रात्री तिच्या हातातून मोबाईल काढून घेतला. त्यावरुन मुलगी आणि वडिलांमध्ये वाद झाला. या वादानंतर मुलगी रागाने घरातून बाहेर गेली, ती पुन्हा परतलीच नाही. अखेर रात्री पावणेदहाच्या सुमारास वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी श्रद्धाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ती कुठेच दिसली नाही. मुलीचा शोध लागत नसल्याचे लक्षात येताच श्रध्दाच्या वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. मात्र अखेर मंगळवारी पोलिसांना जवळच्या विहिरीत श्रद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -