डेटींग अ‍ॅप मागची काळी बाजू

सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक इतरांशी आपल्या भावना इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजेच चॅटिंगच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ ऑडिओ पाठवू शकतात. याचाच वापर करण्यासाठी लोक सोशल मीडियाच्या वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या पचा वापर करतात. बर्याचदा त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर त्याच्या संदर्भात ते जी माहिती शोधत असतात ती माहिती गुगल/याहू यासारख्या सर्च इंजिनच्या वेबसाईटवर त्याचा शोध करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्च इंजिन वेबसाईट आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती किती सोप्या पद्धतीने देऊ शकते यावरती गुगल/याहू अभ्यास करतात आणि जे जाहिरात देऊ इच्छितात त्यांच्याकडून डव्हर्टाइज त्यांची करताहेत असे सांगून मोठे पैसे गुगल आणि याहू सारख्या कंपन्या घेत असतात. जगामध्ये बर्याच ठिकाणी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अथवा रविवारी आठवड्याची सुट्टी कामावरती आणि शाळेत कॉलेजमध्ये असते. ज्या वेळेला तरुण-तरुणी प्रौढ व्यक्ती आणि वृद्ध मंडळी त्यांचा वेळ त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत फॅमीली सोबत घालवतात अथवा त्यांच्यासोबत नवीन नवीन गोष्टी करण्याचे ठरवत असतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक त्यांच्या स्वतःच्या घरापासून दूर राहत असतात, मग ते त्यांच्या शिक्षणासाठी असो अथवा त्यांच्या नोकरीसाठी अथवा व्यवसायासाठी असून असे लोक व्हिडीओ कॉलिंग अथवा व्हिडीओ पच्या माध्यमातून त्यांच्या घरातील लोकांची संवाद साधत असतात. अशा लोकांना सायबर भामटे हे सायबरच्या जाळ्यात डेटिंग एप्लीकेशन अथवा वेबसाईटची अ‍ॅड वारंवार दाखवून, डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून जाळ्यात अडकवतात. आणि असेच जाळ्यात अडकलेले व्यक्ती सायबर भामट्यांना कळत अथवा नकळत विविध प्रकारे पैसे, भेटवस्तू पाठवून स्वतःच्या मौल्यवान वस्तू गमवून बसतात आणि नंतर त्यांना लक्षात येते की समोरील व्यक्ती हा एक सायबर भामटा होता. अशा सायबर भामट्यांच्या जाळ्यात आपण स्वतः अडकू नये याच्यासाठी आपण आपली स्वतःची माहिती म्हणजेच नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोन नंबर तसेच आपला कुठल्याही प्रकारचा आयडी नंबर कोणालाही देऊ नये. आधार-कार्ड, पॅन-कार्ड वरील माहिती कोणालाही सांगू नये. आपले युजरनेम तसेच पासवर्ड त्याच्यासोबत पासवर्ड रीसेट करण्यासाठी ठेवलेले उत्तर तसेच वन टाइम पासवर्ड अथवा कुठल्याही प्रकारचे पिननंबर कोणीही कितीही प्रकारची आपल्याला ऑफर अथवा घाई केली तरी सांगू नये. समोरील व्यक्ती विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला ते स्वतःची एखादी आकर्षक अशी गोष्ट तयार करून सांगू शकतात. त्याच्यात फोटो/व्हिडिओसुद्धा पाठवू शकतात. त्यासोबत त्याचे स्वतःचे लोकेशनसुद्धा असू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्व गोष्टी त्यांच्या असतीलच असं नाही. त्या गोष्टी अपलोड केलेल्या इतर व्यक्तीसुद्धा असू शकतात.
अशीच एक घटना आत्ता आपण बघणार आहोत (नाव-गाव बदललेले आहे) शुक्रवारी फेसबुक बघतांना परेशला एक जाहिरात दिसली. त्यावर व्हिडिओ कॉलवर मोफत गप्पा मारा असे एका स्त्रीच्या आवाजात सांगितले जात होते. ते अ‍ॅप्लिकेशन परेशने डाउनलोड केले. डाऊनलोड केल्यानंतर त्या अपलिकेशनमध्ये नाव, फोन नंबर, लोकेशन आणि ई-मेल व्हेरिफाय झाला. अप्लीकेशनवरती स्टार्ट लुकिंग फॉर पार्टनर असे आल्यानंतर काहीच वेळात समोर एक चायनीज मुलगी आली आणि तिने बोलायला सुरुवात केली. काहीच वेळात व्हाट्सअपचा नंबरसुद्धा त्याने शेअर केला आणि नंतर ती मुलगी आणि परेश ऑनलाईन व्हाट्सअपच्या माध्यमातून गप्पा मारायला लागले. हळूहळू परेशला असे समजूत ले की ती मुलगी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवत आहे म्हणून बरेचदा परेशने विचारले तू कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करतेस ते मलाही सांग जेणेकरून माझेही पैसे वाढतील. त्या मुलीने स्वतःहूनच परेशला 500 डॉलर दिले आणि सांगितले की तू या एका वेबसाईटवर हे 500 डॉलर जमा कर आणि महिन्याभराने त्याच्यात वाढ झाली की तू परत ते मला दे सेम महिन्याभराने 500 चे वाढली किंमत आणि परेशनी ते पैसे परत त्या मुलीला 500 अधिक जे एक्स्ट्रा जमा झाले होते ते असे पैसे पाठवले.

या घटनेमुळे परेशचा या वेबसाईटवरती विश्वास निर्माण झाला आणि त्यालाही वाटू लागली की आपणही या वेबसाईटमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्यालाही फायदा मिळू शकेल म्हणून परेशनी स्वतःचे पैसे त्या वेबसाईटवरती जमा केले. आणि काहीच दिवसांमध्ये ती जी वेबसाईट होती ती बंद झाली. परेशने कॉन्टॅक्टस तसेच त्या मुलीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण वेबसाईट आणि ती मुलगी या दोघांशीपण कॉन्टॅक्ट होत नसल्याचे लक्षात आले आणि याच्यासारखे बरेच लोकांनी त्या बनावट वेबसाईट वरती पैसे भरल्याचे आढळून आले.

त्यामुळे यापासून सावध राहण्यासाठी आपण काय करावे.
1. कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये.
2. ज्या वेबसाईट वरती तुम्ही अकाउंट ओपन करत आहात त्या वेबसाईट संदर्भात माहिती नीट करून घ्यावी.
3. ज्या वेबसाईटवर तुम्ही अकाउंट तयार केलेला आहे ती वेबसाईट ओरीजनल इन्व्हेस्टमेंटची आहे की नाही हे तपासावे कारण बर्याचदा ती साईट क्रिमिनल सर्वसामान्य लोकांना गंडवण्यासाठी ओरिजनल वेबसाईट सारखीच बनावट वेबसाइट तयार करत असतात.
4. कुठल्याही प्रकारे संवाद झालेला असेल, संभाषण झालेले असेल तर तो कायदेशीर पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो त्यामुळे डेटा डिलीट करू नये.
5. तुम्ही जर सायबरच्या जाळ्यात अडकला तर तुम्हाला कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शनसुद्धा मिळू शकते. यासाठी तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट सुद्धा दाखल करू शकता.

  • लेखक – तन्मय दीक्षित