घरमुंबईबेस्टमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची चाचपणी

बेस्टमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची चाचपणी

Subscribe

केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकासचे अधिकारी अभ्यासाला

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आता बेस्ट उपक्रमाचा अभ्यासाला सुरूवात झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून केंद्रातून आलेल्या टीमने बेस्ट उपक्रमासाठीची माहिती घेण्यासाठीची सुरूवात केली आहे. हा संपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी काय काय पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील याची चाचपणी या अभ्यासाच्या निमित्ताने होईल.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या प्रकल्पाअंतर्गत देशभरातून विविध राज्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून मुंबईतील बेस्ट आणि मोनोरेल प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. बेस्टमध्ये गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास विभागातील अधिकारी अभ्यासासाठी येत आहेत. त्यांनी बेस्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून इंटिग्रेटेड टिकिंग सिस्टिमचा प्रकल्प कसा राबवता येईल, यावर चर्चा केली आहे.

- Advertisement -

त्यामध्ये बेस्टमध्ये कोणत्या माध्यमातून महसूल येतो, प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी काय प्रणाली उपलब्ध आहे, रोख पैसे, ऑटोमेटेड तिकीट वेंडिगमधून किती पैसे येतात, प्रवासी ऑनलाईन रिचार्ज कोणत्या माध्यमातून करतात यासारख्या यंत्रणेचा अभ्यास सध्या या अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. बेस्टनेही या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी काय करता येईल याबाबतची माहिती मंत्रालयाला दिली आहे. तसेच ही यंत्रणा राबवण्यासाठी काही बदलही सुचवले आहेत.

बेस्टमध्ये सध्या कोणकोणत्या यंत्रणा वापरून तिकीट दिले जाते याचा अभ्यास आता डेपोच्या ठिकाणी जाऊन हे अधिकारी करणार आहेत. त्यासाठी शहरातील तसेच उपनगरातील डेपोच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हे अधिकारी अभ्यास करतील. सध्या त्यांनी बेस्टची संपूर्ण यंत्रणा, तिकिटाशी संबंधित आर्थिक गणित आणि तिकीट प्रणालीशी संबंधित डेटा याचा अभ्यास पूर्ण केला आहे. येत्या दिवसात प्रत्यक्ष डेपोनिहाय चालणारे कामकाज पाहण्यासाठी ते भेटी देतील. सध्याच्या बेस्टच्या यंत्रणेत ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनचे हॅण्डहेल्ड डिव्हाईस आहेत. तसेच बेस्टकडून उपलब्ध करून दिलेले स्मार्ट कार्ड आहेत. आगामी काळात या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर या स्मार्ट कार्डची जागा वन नेशन वन तिकीट अंतर्गत दिले जाणारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड घेतील.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -