घरमुंबईनवी मुंबईकर पार्किंगमुळे हैराण!

नवी मुंबईकर पार्किंगमुळे हैराण!

Subscribe

शहरात २५ हजार पेक्षा जास्त अवजड वाहने आहेत. त्यामुळे नवी मुंबईत असणारी अनेक अवजड वाहने रहिवाशी भागांत जेथे जागा मिळेल तिथे उभी केली जाऊ लागली आहेत.

नवी मुंबई शहराला अवजड वाहनांचे ग्रहण लागले आहे. एपीएमसी मार्केट, एमआयडीसी आणि जवळच असलेल्या जेएनपीटीमुळे नवी मुंबई शहर हे महत्वाचे मानले जात असल्याने अवजड वाहनांची वर्दळ सतत पहायला मिळते. मात्र नवी मुंबईत पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेक अवजड वाहने ही रहिवाशी भागांत उभी केली जात आहेत. त्यामुळे अवजड वाहनांच्या रहिवाशी भागातील पार्किंगमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. नवी मुंबईला आधुनिक शहराचा दर्जा प्राप्त झालेला असला तरी शहरांतर्गत पार्किंगची प्रश्न कायम आहे. नवी मुंबई शहर वेगाने वाढत असतानाच वाहनांची संख्या तितक्याच वेगाने वाढत आहे. इमारतींमध्ये जागा नासल्याने नागरिक रस्त्यांवर वाहने पार्क करू लागले आहेत. सिडकोने सुनियोजित शहर वसवून नवी मुंबई महापालिकेकडे सुपूर्द केले होते. मात्र लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढल्याने सध्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या जाणवू लागली आहे.

हेही वाचा – डेब्रिज माफियांसाठी नवी मुंबई मनपा सोन्याची अंडी देणारी कोंबडी

- Advertisement -

२५ हजारांपेक्षा जास्त अवजड वाहने

यात आणखी अवजड वाहनांमुळे शहराला बकाल रूप आले आहे. त्यातच ही अवजड वाहने राहिवाशी विभागांत उभी केली जात असल्यामुळे रहिवाशी या वाहनांनामुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच ए. पी. एम. सी. येथे ट्रक टर्मिनल अस्तित्वात आहे. मात्र ए. पी. एम. सी.मध्ये येणाऱ्या बाहेरील राज्यांतील आणि जिल्ह्यांतील वाहनांमुळे अपुरी जागा पडत आहे. शहरात २५ हजार पेक्षा जास्त अवजड वाहने आहेत. त्यामुळे नवी मुंबईत असणारी अनेक अवजड वाहने रहिवाशी भागांत जेथे जागा मिळेल तिथे उभी केली जाऊ लागली आहेत. यात केमिकल आणि अतिधोकादायक अशी रसायनांचे टँकर्स आहेत. त्यामुळे एखादा अपघात घडला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.तर एम. आय. डी. सी. भागात उभ्या करण्यात येणाऱ्या ट्रकमुळे नशाबाजी, वेश्यागमन असे अनैतिक धंदे सुरू असून त्याचा ताण वाहतूक पोलिसांवर येऊ लागला आहे.

हेही वाचा – नवी मुंबईतील सुलभ शौचालयात स्फोट

- Advertisement -

याठीकाणी सर्रासपणे उभी राहतात वाहने

  • उरण फाटा मार्गावर नेरुळ अपोलो रुग्णालय ते निलगिरी गार्डन सोसायटी
  • नेरुळ सेक्टर १९ रायन इंटरनॅशनल स्कुल, माधवी सोसायटी
  • कोपरखैरणे गाव ते गुरुकृपा मैदान मार्ग
  • घणसोली सद्गुरू रुग्णापायाच्या मागील मार्ग
  • नेरुळ सेक्टर १२ गावदेवी मंदिर ते तेरणा विद्यालय मार्ग
  • नेरुळ रामलीला मैदान मार्ग
  • तुर्भे तहसील कार्यालयासमोर
  • तुर्भे गाव रामतानु माता मंदिराजवळ
  • एम आय डी सी भागांतील अनेक मार्ग
  • नेरुळ तेरणा रुग्णालयासमोरील मार्ग

याशिवाय शहरातील अनेक रहिवाशी भागांत अवजड वाहने खुलेआम उभी केली जात आहेत. रहिवाशी भागांत अवजड वाहने उभी करून यातील चालक आणि क्लीनर बिनधास्तपणे नशा करून झोपेलेले असतात. शांतता असलेल्या ठिकाणी वाहन पार्क केल्यावर चालकांना लुबाडण्याचे प्रकार घडत असल्याने चालक रहिवाशी विभागात वाहन सुरक्षितरीत्या वाहन उभे करतात. नवी मुंबई महापालिका रहिवाशी विभागातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. यात शहर मोबालिटी प्लॅन, शहराचे रस्ते नियोजन करण्यासाठी सल्लागार नेमणे, सायकल प्रोजेक्ट, अडथळा विरहित पदपथ जेणेकरून नागरिकांनी चालताना रस्त्यावरून मन चालता पदपथाचा वापर करावा.

पोलिसांचे दुर्लक्ष

निलगिरी गार्डन सोसायटीने उरण फाट्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांविरोधात पालिकेला पत्र लिहिले होते.पालिकेने दखल घेत वाहतूक विभागला पत्र दळून यावर तोडगा काढून वाहनांवर कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. काही अंतरावर उभे असलेले वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांना पकडत आहेत. मात्र भल्या मोठया अनधिकृतपणे उभ्या केलेल्या अवजड वाहनांकडे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात आहे.


हेही वाचा – प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबईत ५ रुपयात सायकलवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -