घरताज्या घडामोडीNawab Malik Arrest- ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील- नारायण राणे

Nawab Malik Arrest- ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील- नारायण राणे

Subscribe

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मलिक यांना अटक झाल्यानंतर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील असा टोला राणे यांनी हाणला आहे. तर मलिक यांचा थेट संबंध डी गँगबरोबर असल्याचाही आरोप केला आहे.

राणे यांनी मलिक यांना ईडीकडून अटक होणारच होती असे म्हटले आहे. त्याचबरोबर महाआघाडीत डी गँगची बरीच माणसे आहेत असे सूचक विधान राणे यांनी केले .

- Advertisement -

तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही मलिक यांचा डी गँगशी संबंध असेल तर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असे म्हटले आहे. तसेच मलिक यांना कॅबिनेट राहण्याचा आता अधिकार राहीलेला नाही यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर पाटील यांनी ज्या नेत्यांना अटक होईल त्यांना सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल अन्यथा भाजपला आंदोलन करावे लागेल असा इशारा पाटील यांनी दिला  आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -