घरताज्या घडामोडीNawab Malik Arrested : नवाब मलिक पीएमएलए कोर्टात दाखल, ईडीकडून कोठडी मागण्याची...

Nawab Malik Arrested : नवाब मलिक पीएमएलए कोर्टात दाखल, ईडीकडून कोठडी मागण्याची शक्यता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले आहे. ईडीने ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक केली आहे. ईडीकडून नवाब मलिकांची पुढील चौकशीसाठी कोठडी मागण्यात येण्याची शक्यता आहे. अॅड. अमित देसाई नवाब मलिकांकडून युक्तिवाद करतील तर ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करतील. नवाब मलिकांकडून अमित देसाई काय बाजू मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचे ईडीच्या अरेस्ट ऑर्डरमध्ये सांगितले आहे.

राज्याचे अल्पलंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर पीएमलए कोर्टात हजर करण्यात आले आहे. नवाब मलिकांना आता ईडी कोठडी होणार की न्यायालयीन कोठडी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नवाब मलिकांना किती दिवसांची कोठडी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या वेळी छापेमारी केली यानंतर त्यांना सकाळी ७.४५ वाजता ईडीने ताब्यात घेतलं. तब्बल ८ तासांची चौकशी केल्यानंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अॅड अमित देसाई कोर्टात नवाब मलिकांच्या बाजूने युक्तिवाद करतील.

ईडीकडून अटक आदेश जारी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिकांना अटक केल्याचा आदेश जारी केला आहे. मी नीरज कुमार, ईडी झोन १ चा सहाय्यक संचालक, नवाब मलिक, वय ६२ वर्ष, राहणार २१८/सी २, नूर मंझिल, एलबीएस मार्ग, कुर्ला (प) मुंबई, हे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत दोष आढळले आहेत. मला असलेल्या अधिकारानुसार नवाब मलिकांना मी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी, दुपारी २.४५ वाजता अटक करत आहे. नवाब मलिक यांना याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. असे ईडीच्या अटक आदेशात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Nawab Malik Arrested : नवाब मलिक अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना फोन, सायंकाळी वर्षावर खलबतं

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -