घरमुंबईराष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल

Subscribe

आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाले आहेत.

कुख्यात गुन्हेगार दाऊदचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी ते निवडणुका पूर्ण होईपर्यंत मुभा देण्याची मागणी करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत प्रफुल्ल यांनी निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

…म्हणून पाठवली नोटिस

वरळी येथील सीजे हाऊस या इमारतीत दाऊदचा विश्वासू सहकारी इक्बाल मिर्ची याच्या नावाने सदनिका आहे. या इमारतीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी पटेल यांनी आर्थिक व्यवहार केला आहे. या व्यवहारातून पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नोटीसमध्ये प्रफुल्ल पटेल यांना मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांची चौकशी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -