घरमुंबईअडगळीत पडलेल्या मुंबई क्राईम ब्रँचला आयुक्तांमुळे नवीन उभारी

अडगळीत पडलेल्या मुंबई क्राईम ब्रँचला आयुक्तांमुळे नवीन उभारी

Subscribe

एकेकाळी मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढणारे मुंबई क्राईम ब्रँचला मागील काही वर्षांपासून अडगळीत टाकण्याचा आले होते.त्यामुळे क्राईम ब्रान्चची गुन्हेगारावरची वचक कमी झाली होती. परंतु मुंबई पोलीस आयुक्तांनी अडगळीत पडलेल्या क्राईम ब्रँचला नवी उभारी दिली असून या पुढे मुंबईतील महत्वाच्या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्याचा निश्चय घेण्यात आला असल्याचे समजते.

मुंबई पोलीस दलाचा कणा समजला जाणार्‍या ’क्राईम ब्रँचला घडवण्यामागे एकेकाळी अनेक दिग्गज पोलीस अधिकार्‍यांचे यॊग्यदान प्राप्त झाले आहे. मुंबईतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यात क्राईम ब्रान्चचा सर्वात मोठा वाटा आहे. पूर्वी क्राईम ब्रँच मध्ये येण्यासाठी अनेक पोलीस अधिकार्‍यामध्ये चुरस लागत होती, परंतु मागील काही वर्षांपासून क्राईम ब्राँचला अडगळीत टाकण्यात आले होते.

- Advertisement -

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून मुंबईत होणार्‍या गुन्ह्याच्या तपासाची माहिती क्राईम ब्रँचला न देता पोलीस ठाणे स्थरावर परस्पर गुन्ह्याची उकल करण्याचे तोंडी फर्मान काढण्यात आले होता. त्यामुळे क्राईम ब्रँचला गुन्ह्याची माहिती मिळणे अवघड होऊन बसले होते. तत्कालिन आयुक्त देखील दखल घेत नसल्यामुळे क्राईम ब्रँचचे अधिकारी हतबल झाले होते.

मुंबईत एखादा गुन्हा घडल्यास त्याची माहिती क्राईम ब्रँचला कळू न देता शक्यतो परस्पर गुन्ह्याची उकल पोलीस ठाणे स्तरावर करण्यात येत होती. क्राईम ब्रँचला पोलीस ठाण्याकडून गुन्ह्याची कागदपत्रे मिळवण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक वेळा तर या कारणावरून क्राईम ब्रँच अधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडत होती. एखादा गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्याची माहिती देण्यास पोलीस ठाण्याकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे बहुतांश गुन्हे उघड झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांना कळत होते. या सर्व प्रकारामुळे मुंबई क्राईम ब्रँच अडगळीत पडले होती.

- Advertisement -

मात्र मुंबई पोलीस दलाचे आयुक्त संजय बर्वे यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी क्राईम ब्रँचला पूर्वी प्रमाणे बळकट करण्याचा निर्णय घेतला, गुन्ह्या संदर्भतील सर्व माहिती क्राईम ब्रँचला देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली असल्याचे क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍याकडून समजते. आम्हाला आता पोलीस ठाण्याकडून कुठलीही माहिती सहज उपलब्ध होत असल्याचेही काही अधिकर्‍यांचे म्हणणे आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या उभारीमुळे क्राईम ब्रँचमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असल्याचे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -