घरदेश-विदेशबांगलादेशी महिलेने दिला दोन महिन्यात दोन बाळांना जन्म

बांगलादेशी महिलेने दिला दोन महिन्यात दोन बाळांना जन्म

Subscribe

बांगलादेश येथील धाका शहरात एका महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. एका बाळाचा जन्म झाल्यानंतर २६ दिवसांनी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यदायक घटना समोर आली आहे.

आतापर्यंत आपण जुळ्या मुलांचा जन्म हा एकावेळसच होतो असे ऐकले होते. मात्र बांगलादेश येथे एका महिलेने एका बाळाला जन्म दिल्यानंतर २६ दिवसांनी दुसऱ्या बाळाचा जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बाळाला जन्म देणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. बांगलादेश येथे जोशोर शहरातील अल-दिन रुग्णालयात या महिलेने बाळांना जन्म दिला. २२ मार्च रोजी या महिलेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. दुसऱ्यांदा या महिलेला मुलगी झाली. दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असून या बाळांची आई आनंदी आहे. अशा प्रकारची प्रसुती क्वचितच बघायला मिळते असे डॉक्टरांनी सांगितेल आहे.

दोन्ही बाळाची प्रकृती स्थिर

डॉक्टरांनी दिलेल्या महिती नुसार,”महिला मागील अनेक महिन्यांपासून तपासणी साठी येत होती. या महिलेच्या गर्भात जुळे असल्याचे समजले. २५ फ्रेब्रुवारी रोजी या महिलेने पहिला मुलाला जन्म दिला. तिच दुसर बाळ त्याेवळी विकसीत नव्हते यामुळे दुसऱ्या बाळाची प्रसुती करण्यात आली नाही. २२ मार्च रोजी या  दुसऱ्या बाळाची प्रसुती करण्यात आली. असा प्रकार क्वचितच बघायला मिळतो. सध्या दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -