घरताज्या घडामोडीमुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी पोलीस आयुक्तालयाकडून नव्या सूचना

मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी पोलीस आयुक्तालयाकडून नव्या सूचना

Subscribe

मुंबईत सध्या वाहतूकीसाठी रस्ते कमी पण वाहनांची संख्या अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून मुंबईतील उबेर व इतर टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी मुंबई पोलीस आयुक्तांलयाकडे येत आहेत. 

मुंबई शहरात दररोज टॅक्सी रिक्षा सारख्या वाहनांची संख्या वाढत आहे. मुंबईत सध्या वाहतूकीसाठी रस्ते कमी पण वाहनांची संख्या अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून मुंबईतील उबेर व इतर टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी मुंबई पोलीस आयुक्तांलयाकडे येत आहेत.  याच तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील ओला, उबर आणि इतर टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील सध्याच्या वाहतूकीच्या समस्यांबाबत आणि टॅक्सी रिक्षा चालकांच्या भूमिका आणि कर्तव्याबाबत माहिती देत काही नव्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   जाणून घ्या मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी काय आहेत नव्या सूचना.

- Advertisement -
  • मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
  • टॅक्सी रिक्षा चालक रेल्वे स्थानकांसमोर चूकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात त्यामुळे जनतेला त्रास होतो त्यामुळे शिस्तीचे पालन करा.
  • वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर वाहतूक निमयांप्रमाणे कारवाई केली जाईल.
  • ज्या ठिकाणी टॅक्सी रिक्षांचे थांबे काढून टाकले असतील त्याची यादी संबंधीत पोलीस ठाण्यात देण्यात यावी. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • मुंबईत अनेक ठिकाणी रिक्षाचे पुरेसे स्टँड नाहीत त्यामुळे पुरेसे स्टँड निर्माण करण्यासाठी संभाव्य स्टँडची यादी वाहतूक पोलिसांना सादर करावी.

मुंबईतील सर्व टॅक्सी आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मालकांनी सर्व वाहतूकीच्या नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करण्याची आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अशाच प्रकारची बैठक पुन्हा २ एप्रिल रोजी होणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Maharashtra Heat Wave : मुंबईत पहिल्यांदाच पारा ४१ डिग्री सेल्सिअस तर पुढील २ दिवस पुणेकरांचाही घामटा निघणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -