घरमुंबईनायजेरियन फॅशन डिझायनरला ६ लाखाच्या कोकेनसह अटक

नायजेरियन फॅशन डिझायनरला ६ लाखाच्या कोकेनसह अटक

Subscribe

अंधेरी पोलिसांनी सुमारे ७० ग्रॅम कोकेनसह एका नायजेरियन तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी फॅशन डिजायनर असल्याचं तिच्या व्यावसायिक व्हिसावरून समोर आलं आहे.

ड्रग्ज तस्करी प्रकरणी एका नायजेरियन फॅशन डिझायनरला अंधेरीच्या लोखंडवाला संकुल येथून अटक करण्यात आली असून तिच्याजवळून पोलिसांनी ७० ग्राम कोकेन हस्तगत केले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात ६ लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई शनिवारी दुपारी ओशिवरा पोलिसांनी केली आहे. इडेन लिमोह (२७) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन फॅशन डिझायनरचं नाव आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातल्या रॉयल पाम येथे राहणारी इडेन लिमोह ही २०१८ मध्ये व्यवसायिक व्हिसावर मुंबईत आली होती. एक नायजेरियन महिला कोकेनसह अंधेरीच्या लोखंडवाला संकुल येथे येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लोखंडवाला येथे सापळा रचून या नायजेरिन महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.


हेही वाचा – नऊ लाख रुपयांच्या एमडीसह नायजेरीयन तरुणाला अटक

अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

महिला पोलिसांनी तिची अंगझडती घेतली असता तिच्याजवळ ७० ग्रॅम कोकेन मिळून आले. ओशिवरा पोलिसांनी इडेन लिमोह या फॅशन डिझायनरला लागलीच अटक केली. तिच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिच्या सहकाऱ्याचा शोध घेत असून लवकरच त्याला देखील अटक करण्यात यश येईल असा विश्वास लोखंडवाला पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -