घरमुंबईसिमेंट काँक्रीटच्या २३५ रस्त्यांवर भेगा, मलमपट्टीला ६ कोटी खर्च

सिमेंट काँक्रीटच्या २३५ रस्त्यांवर भेगा, मलमपट्टीला ६ कोटी खर्च

Subscribe

पश्चिम उपनगरांमध्ये एकूण २३५ रस्त्यांवर भेगा पडल्या असून, त्या भरण्यासाठी तब्बल ६ कोटी १९ लाखांचं कंत्राट पालिकेनं दिलं आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने बनवलेले डांबरी रस्तेही वाहून गेल्यामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे दिसून लागले आहे. विशेष म्हणजे नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने काँक्रीट रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आता पश्चिम उपनगरातील २३५ सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्यांवर भेगा पडल्याची बाब निदर्शनास आली असून खड्डयांपाठोपाठ आता काँक्रीटच्या मलमपट्टीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

रस्ते खचण्याची भिती?

मुंबईत १९८९-९० पासून पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत अनेक मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तसेच जुन्या टी.पी. स्कीममधील काही काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या काँक्रीटच्या रस्त्यावर दर ४५ मीटर अंतरावर प्रसरण सांधे अर्थात एक्सपान्शन जॉईंट्स असतात. तसेच डमी जॉईंट्स आणि इतर सांधे आहे. मुंबईतील २००७-०८ पूर्वी बांधलेल्या रस्त्यांवरील हे जॉईंट्स उघडे पडले आहेत. या सांध्यांमधून पाणी जमिनीत झिरपून रस्ते खचण्याची भिती असल्याने हे जॉईंट्स बुजवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

- Advertisement -

६ कोटी १९ लाखांचं कान्ट्रॅक्ट

पश्चिम उपनगरात एकूण २३५ जुन्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे सांधे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी महाालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. महापालिकेने यासाठी ९ कोटी ३ लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार करून निविदा मागवली होती. त्यामध्ये स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ३४ टक्के कमी बोली लावून हे काम ६ कोटी १९ लाख रुपयांना मिळवले आहे. त्यामुळे एकट्या पश्चिम उपनगरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील भेगा भरण्यासाठी सुमारे सव्वा सहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेने यंदाही खराब रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केले आहे. तर काही खराब रस्ते हे कंत्राटदारांकडे असल्याने त्यावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही त्यांचीच राहणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रीटचा रफी अहमद किडवाई मार्गावर खड्डे पडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.


हेही वाचा – ओशिवरा स्मशानभूमी विद्युत दाहिनीचे अर्धवट काम कंत्राटदाराला भोवले

घाटकोपरची नायडू कॉलनी खड्डयात

घाटकोपर येथील पुलाचे काम सुरू असल्याने घाटकोपर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील नायडू कॉलनी, समता कॉलनी, रेल्वे पोलीस वसाहत आदी ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. परंतु, मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे तयार झाले असून हे खड्डे न बुजवल्यास नागरिकांनी आदोंलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -