घरमुंबईविद्यापीठाच्या ई लॉकरमध्ये नऊ लाख पदव्या

विद्यापीठाच्या ई लॉकरमध्ये नऊ लाख पदव्या

Subscribe

बनावट प्रमाणपत्रावर अंकुश लागण्याची शक्यता

पदवी व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन ठेवता यावीत यासाठी केंद्र सरकारने नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी) हे ऑनलाईन लॉकर सुरू केले. ऑनलाईन लॉकरमध्ये पाच वर्षांत मुंबई विद्यापीठाने तब्बल नऊ लाख पदवी प्रमाणपत्रे ठेवली आहेत. पदवी प्रमाणपत्रे ऑनलाईन ठेवल्याने बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना अकुंश बसण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी) हे ऑनलाईन लॉकर 22 फेब्रुवारी 2018 पासून सुरू केले. यामध्ये मुंबई विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ठेवण्यात येत आहेत. विद्यापीठाने 2014 ते 2018 पर्यंत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नोलॉजी आणि लॉ अंतर्गत 8 लाख 99 हजार 60 पदव्या संकेतस्थळावर टाकल्या आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारात दिली.

- Advertisement -

पाच वर्षांत पदव्यांची तुलना केली असता 2014 मध्ये सर्वाधिक जास्त 1 लाख 93 हजार 398 पदव्या ऑनलाईन केल्या, तर 2018 मध्ये 1 लाख 89 हजार 538 पदव्या ऑनलाईन संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये कॉमर्सच्या शाखेच्या पदव्या सर्वाधिक आहेत. ज्याची संख्या 3 लाख 98 हजार 650 इतक्या आहेत. त्यानंतर आर्ट्सच्या 1 लाख 50 हजार 680, टेक्नोलॉजीच्या 1 लाख 29 हजार 603 आणि सायन्सच्या 1 लाख 11 हजार 625 पदव्या आहेत. मॅनेजमेंटच्या 76 हजार 851 आणि लॉच्या 31 हजार 652 संख्या आहेत. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नसल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना आळा घालण्यास यामुळे मदत होत आहे. प्रमाणपत्र तपासण्याच्या किचकट प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या पदव्या आणि शैक्षणिक नक्कल प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त होईल.
– अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ता.

- Advertisement -

शाखा         प्रमाणपत्रे
आर्ट्स        1,50, 680
सायन्स       1,11, 625
कॉमर्स       3,98, 650
मॅनेजमेंट     76, 851
टेक्नोलॉजी   1,29, 603
लॉ           31, 651
……………………….
एकूण      8,99, 060

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -