घरमुंबईमोटरमन केबिनवर सीसीटीव्ही हवेत विरले

मोटरमन केबिनवर सीसीटीव्ही हवेत विरले

Subscribe

80 लाख प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या मोटरमन केबिनवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता एक महिनासुध्दा झाला मात्र अद्यापही मोटरमनच्या केबिनवर सीसीटीव्ही कॅमेरा लागला नाही. यामुळे रेल्वे प्रशासनासह, रेल्वे सुरक्षा यंत्रेणाच्या सुमार कारभारामुळे मुंबई रेल्वेवरील लाखो प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

धावत्या लोकलमध्ये फटका हल्ल्यापासून बचावाची उपाययोजना रखडल्याने मुंबईकरांची सुरक्षा वार्‍यावरच आहे. फटका पद्धतीने होणारे जीवघेणे हल्ल्यावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोटरमन केबिनवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे केबिनच्या बाहेरचे दृश्य टिपून रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडून संबंधित आरोपीवर त्वरीत कारवाई करण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे होते. मात्र महिना उलटूनही मोटरमन कोचला सीसीटीव्ही कार्यान्वित झालेले नाही.

- Advertisement -

फटका गँग, लोकलवर होणारी दगडफेक याशिवाय रेल्वे रूळ व त्या शेजारी होणार्‍या घटनांना कॅमेर्‍यात कैद करणे व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे हा उद्देश सीसीटीव्ही बसवण्यामागे होता. मात्र अद्याप सीसीटीव्ही योजना रखडली आहे.

गेल्या आठवड्यातील फटकाच्या घटनांवर नजर टाकल्यास सकाळी आणि दुपारच्या वेळेत अशा घटना वाढल्याची वस्तुस्थिती आहे. लोकल प्रवाशांवर केवळ फटका नव्हे तर दगड फेकीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात घडल्या आहेत. लोकल वक्तशीरपणे चालवण्यासाठी हजारो कोटींचे प्रकल्प केवळ कागदावर आहेत. प्रत्यक्षात त्याची पूर्तता नाही. याचा प्रत्यय फटका सुरक्षेबाबत ही येत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. या परिस्थितीत फटका पद्धतीवर पूर्णपणे नियंत्रण राखण्यास रेल्वे सुरक्षा यंत्रणेला सातत्याने अपयश येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -