घरमुंबईसोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद

सोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद

Subscribe

विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्राद्वारे माफी मागण्याची तयारी देखील दाखवली होती. मात्र मातोश्रीवरून थेट नकार देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा विरोध पाहता एक पाऊल मागे जात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्राद्वारे माफी मागण्याची तयारी देखील दाखवली होती. मात्र मातोश्रीवरून थेट नकार देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगत सोमय्या यांना चक्क भेटच नाकारण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचा सर्वस्वी निर्णय शिवसैनिकांवर सोडला असून, जी माझ्या शिवसैनिकांची भूमिका तीच माझी देखील भूमिका असे उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे मातोश्रीच्या एका निकटवर्तीयाने सांगितले.

सोमय्या यांच्या आरोपामुळे उद्धव ठाकरेही संतप्त 

दरम्यान किरीट सोमय्या यांनी पालिका निवडणुकीमध्ये केलेले आरोप हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देखील जिव्हारी लागले असून, जरी सोमय्या यांनी माफी मागितली तरी त्याचा काही फायदा होणार नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देखील किरीट सोमय्या यांच्या एका जागेवरून युतीत बिघाडी आणण्याच्या मानसिकतेत नाहीत. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील माझे शिवसैनिक सोमय्यांवर नाराज आहेत. मी शिवसैनिकाच्या नाराजीच्या विरोधात जाणार नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर अजूनही टांगतीच तलवार आहे असे म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -