घरमुंबईमैदानांअभावी ठाण्यात राजकीय सभांची कोंडी

मैदानांअभावी ठाण्यात राजकीय सभांची कोंडी

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता जेमतेम दहा दिवस उरले असून येत्या आठवड्यात ठाण्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. मात्र शहरातील प्रमुख मैदानांवर राजकीय सभा घ्यायला बंदी असल्याने सभा घ्यायच्या कुठे असा पेच निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता जेमतेम दहा दिवस उरले असून येत्या आठवड्यात ठाण्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्या चर्चेचा विषय ठरलेले मनसेचे राज ठाकरे यांच्या सभा होणार असल्याचे बोलले जात असले तरी शहरातील प्रमुख मैदानांवर राजकीय सभा घ्यायला बंदी असल्याने सभा घ्यायच्या कुठे असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सध्या पर्यायी जागांचा शोध सुरू आहे. शहरातील सेंट्रल मैदान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, गावदेवी मैदान आणि इतर लहान मोठ्या मैदानांवर राजकीय सभांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावरील प्रचारसभांनाही परवानगी न देण्याची भूमिका महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घेतली आहे. अशा परिस्थितीत राजकीय प्रचार करायचा तरी कुठे आणि कसा असा प्रश्न राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

राजकीय पक्षांनी शिवाजी मैदान तसेच गडकरी रंगायतन परिसरात प्रचार सभा घेण्याविषयी अर्ज केले आहेत. मात्र प्रचारसभांना परवानगी देण्याचे अधिकार महापालिका प्रशासन आणि पोलिसांना आहेत. प्रचार सभांबाबत आमच्याकडे अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
– अनिल पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे

- Advertisement -

राजकीय सभांमुळे नागरिकांची गैरसोय 

गेल्या महिन्यापासून शहरात प्रचारसभांसाठी जागा आरक्षित करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. मात्र शहरात जी काही मोजकी आणि मोक्याच्या जागी असलेली मैदाने आहेत. त्यावर राजकीय प्रचार करण्यास बंदी असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. साकेत आणि पोलीस परेड ग्राऊंड पोलिसांच्या ताब्यात असल्याने तिथेही प्रचारसभा होणार नाहीत. मध्यंतरी गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर सभा झाल्या होत्या. तेव्हा त्या परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. त्यामुळे त्या राजकीय अडवणुकीबद्दल नागरिकांच्या मनात राग आहे.

प्रचारसभांसाठी जागा उपलब्ध करून देण्याविषयी महापालिकेकडे अद्यााप तरी कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्ज आलेला नाही.
– संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका

- Advertisement -

मैदानांचा शोध सुरु 

शहरातील परंपरागत मेदाने राजकीय सभांसाठी उपलब्ध नसल्याने आता राजकीय पक्षांनी रेमंड कंपनीच्या आवारातील मैदान, ढोकाळी येथील हायलँन्ड पार्क तसेच घोडबंदर रोड परिसरातील मैदानांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र मुख्य शहरापासून दूर असलेल्या या मैदानातील सभांमुळे कितपत वातावरण निर्मिती होईल. तसेच त्या सभांना कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतीत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात शंका आहे.

हेही वाचा –

साध्वी, जनतेचा शाप तुला लागणार, अन् तू हरणार !

चौकीदारची नाटकबाजी भाजपला नाही वाचवणार – मायावती

बलात्कार करुन मुलीला जाळले; बांगलादेशात निर्भया आंदोलन सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -